facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / मोदी सरकारचा मोहम्मदी कारभार: शिवसेना

मोदी सरकारचा मोहम्मदी कारभार: शिवसेना

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं मोदी सरकारवरील हल्ल्याची धार आणखी वाढवली आहे. ‘निवडणुका नसतानाही लोकांच्या बोटांना ‘शाई’ लावून रांगेत उभे करणे हा राष्ट्रीय अपराध आहे. मोदी सरकारच्या या मोहम्मदी कारभाराची किंमत सव्वाशे कोटी जनता भोगत आहे,’ असा थेट आरोप करतानाच, ‘अशा प्रसंगी जनतेच्या आक्रोशाचे लाऊडस्पीकर होणारे बाळासाहेब हवे होते,’ अशी खंत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून ‘सामना’नं अग्रलेख लिहिला आहे. त्यात उद्धव यांनी मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय व देशभक्तीचे दाखले देऊन या निर्णयाची केली जाणारी पाठराखण यावर कडाडून हल्ला चढवला आहे. अशा परिस्थितीत बाळासाहेबांची उणीव भासत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

> १२५ कोटी लोकांच्या जीवनाचा सांगाडा झाला आहे. बाजार बंद, कारखाने बंद, रोजगार बंद. चुली विझल्या. लोकांची मनेही विझून गेल्यासारखी दिसतात. या विझलेल्या मनावरील राखेवर फुंकर मारून निखारे धगधगत ठेवायला बाळासाहेब तुम्हीच हवे आहात.

> सरकारने आपल्याच मायबाप जनतेला भिकारी बनवून रस्त्यावर उभे केले. रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता. तसे जनतेला भिकारी, कंगाल बनवून ‘यालाच देशभक्ती म्हणतात बरं का?’ असे तोंडाचे डबडे वाजवणार्‍यांचे मुस्काट फोडून जनतेच्या आक्रोशाचे लाऊडस्पीकर होणारे शिवसेनाप्रमुख आज हवे होते ही जनतेची भावना आहे.

> देशात नेत्यांची संख्या कमी नाही. गल्लीतल्या एका झाडावर दगड मारला तर पंचवीस बिनकामाचे पुढारी खाली पडतील. पण यातील एक तरी पुढारी जनतेच्या कामाचा राहिला आहे काय? एक तरी पुढारी जनतेच्या मनातील संतापाचा वणवा पेटवण्यासाठी स्वत: त्या वडवानलात घुसून जळायला तयार आहे काय?

> निवडणुका नसतानाही लोकांच्या बोटांना ‘शाई’ लावून रांगेत उभे करणे हा राष्ट्रीय अपराध आहे. शाई लावलेली बोटे खिशात लपवून लोक निराश मनाने जगत आहेत. हे नैराश्य म्हणजेच देशभक्ती असे कुणाला वाटत असेल तर असे बोलून देशभक्तांचा अपमान करणार्‍यांच्या जिभा हासडून काढायला बाळासाहेब तुम्हीच हवे होता.

> ५००-१००० च्या नोटा रद्द करून जनतेला भुकेकंगाल करणे हे जालियनवाला बागेपेक्षाही भयंकर आहे. या परिस्थितीशी टक्कर देणारे नेतृत्व आज कुठे दिसत नाही. सर्वत्र अंधार आहे व त्या अंधारातून जनतेचा आक्रोश कानात घुमत आहे. ‘‘बाळासाहेब परत या.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *