facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / मंदिरांच्या देणगीसाठीचे नियम काय?
donation

मंदिरांच्या देणगीसाठीचे नियम काय?

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्जिकल’ निर्णय घेत चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. अचानक घेतलेल्या या निर्णयाने अनेकांचे धाबे दणाणले. काही महत्त्वाच्या सेवा वगळता सर्व ठिकाणी जुन्या नोटांना बंदी घालण्यात आली. मात्र मंदिरातील दानपेट्या अद्यापही खुल्याच आहेत. ज्या धर्मदाय आयुक्त कार्यालयांतर्गत मंदिरे येतात त्यांनाही मंदिरांना पैसे स्वीकारण्याची परवानगी असल्याबाबतचे कुठलेही निर्देश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबरच्या रात्री बारापासून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील धर्मदाय आयुक्त कार्यालयाने १० नोव्हेंबर रोजी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयांना पत्र पाठविले. या कार्यालयांतर्गत येणाऱ्या कार्यालयांनी जुन्या ५०० आणि १ हजारच्या नोटा स्वीकारू नये, अशा सूचना या पत्राच्या माध्यमातून दिल्या. मात्र, या पत्रामध्ये मंदिरांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

अनेक मंदिरात जुन्या नोटा स्वीकारल्या जात असून काही मंदिरांनी स्वतःहून पुढाकार घेत जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. खामला येथील शीतला माता मंदिरातील दानपेट्यात जुन्या ५०० आणि १ हजारच्या नोटा टाकू नये, अशी सूचनाच मंदिर व्यवस्थापनाने लावली आहे.

खबरदारी आवश्यक

पैशांचे सर्व व्यवहार पारदर्शक हवे. कुणालाही काळा पैसा पांढरा करण्याची संधीच देऊ नये. अनेक छुप्या मार्गातून वेगवेगळ्या क्लृप्‍त्या वापरून काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांची सर्कस सुरू आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांकडे कुठलाच पर्याय नसावा. यासाठी खबरदारी म्हणून मंदिरांसाठीही नियम लावावे अशी मागणी आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

मंदिरांसाठी अद्याप सूचना नाही

नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेस्थानके, विमानतळ आणि सरकारी बसस्थानक अशा ठिकाणी ५०० आणि १ हजार रुपयांची नोट स्वीकारली जात आहे. बँकांमध्ये ३० डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. मंदिरांना याबाबत कुठल्याच सूचना नसल्याचे सांगत मंदिरांकडूनही जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. नागपुरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी याबाबत संपर्क साधला असता मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी पाठवून त्यांना याबाबत विचारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *