facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / शिवसेना मानेना; राजनाथ यांचा उद्धवना फोन
uddhav-rajnath

शिवसेना मानेना; राजनाथ यांचा उद्धवना फोन

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेना आणि अकाली दल हे दोन घटक पक्ष नोटाबंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपल्याच सरकारविरोधात विरोधकांशी हातमिळवणी करून रस्त्यावर उतरल्याने भाजपची कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून हालचाली होत असून बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.

शिवसेना आणि अकाली दलाचा विरोध सरकारसाठी हिवाळी अधिवेशनात डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळेच उद्धव यांची समजूत काढण्याची जबाबदारी राजनाथ या वरिष्ठ नेत्यावर देण्यात आली आहे. त्यानुसार राजनाथ यांनी उद्धव यांना फोन करून विस्तृत चर्चा केली. या चर्चेत उद्धव यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत करताना या निर्णयाची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्यात कुठेही नियोजन दिसत नाही, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केल्याचे ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे. नोटाबंदीमुळे सामान्य लोकांचे कसे हाल होत आहेत, निर्णयाला आठ दिवस उलटूनही बँका आणि एटीएम यांच्याबाहेर लोकांच्या रांगा कायम आहेत, याची कल्पना उद्धव यांनी राजनाथ यांना दिली. या चर्चेनंतर उद्धव यांचा विरोध मावळला का?, शिवसेनेची संसदेत नेमकी काय भूमिका असणार?, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. शिवसेना वा भाजपकडूनही कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

अनंत गीतेही मोर्चात उतरणार होते!

तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिल्लीत राजभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते हेही सहभागी होणार होते. दुपारी बारा वाजेपर्यंत तशी माहिती मिळत होती. गीतेंनी मोर्चात सामील व्हावे, यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आग्रही होते. पण केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री स्वतःच्याच सरकारविरोधात निघणाऱ्या मोर्चात सहभागी झाल्यास नामुष्की होणार याची जाणीव असलेले पंतप्रधान मोदी यांनी राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि मनोहर पर्रीकर यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची कशीबशी समजूत काढण्यात यश मिळविल्याचे समजते. राष्ट्रपतींना सादर करावयाच्या निवेदनाचा मजकूर उद्धव ठाकरे यांना मोर्चा निघण्याआधी वाचून दाखविण्यात आला. त्यात ‘सर्वसामान्यांनी कष्टाने कमावलेला पैसा’ असा बदल उद्धव ठाकरे यांनी करण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *