facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / खासगी हॉस्पिटलमध्ये चेकवर फुली

खासगी हॉस्पिटलमध्ये चेकवर फुली

आवाज न्यूज लाईन

पुणे-‘चेक द्यायचा असेल, तर अकाउंट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन या. चेक दिला तरी तुम्हाला डिस्चार्ज घेताना अडचणी येऊ शकतील. जोपर्यंत चेक वटत होत नाही, तोपर्यंत डिस्चार्ज मिळणे अशक्य आहे…’
खासगी हॉस्पिटलमधून गुरुवारी पेशंटच्या नातेवाइकांना सुनावण्यात येत होते, तर दुसरीकडे ‘आमच्याकडे चेक असेल तर काय करायचे… चेक चालणार नाही का,’ असा सवाल एक महिला बिलिंग विभागाच्या कर्मचाऱ्याला करीत होती. सरकारने चेक स्वीकारण्याचा आदेश दिला असला, तरी त्याच्या उलट खासगी हॉस्पिटलमध्ये अडवणूक केली जात असल्याने त्या महिलेला माघारी फिरावे लागल्याचे चित्र शहराच्या पूर्व भागातील खासगी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाले. खासगी हॉस्पिटलने नोटाबंदीचा नियम लागू केला आहे. त्यामुळे क्रेडिट, डेबिट कार्ड; तसेच चेकने पेमेंट स्वीकारण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. त्या संदर्भात हॉस्पिटलमधील ‘मटा’च्या प्रतिनिधीने या गोंधळाचा ‘आँखो देखा हाल’ अनुभवला.
शहराच्या पूर्व भागातील हॉस्पिटलमध्ये दुपारनंतर बिलिंग विभागात पैसे भरण्यासाठी फारशी गर्दी नव्हती; पण बिलिंग विभागात काही पेशंटचे नातेवाइक रांगेत उभे होते. बिलिंगच्या काउंटरवर पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याच्या वृत्तपत्रांच्या बातम्यांचे कात्रण लावल्याचे पाहायला मिळाले. रांगेतील पहिल्या दोन व्यक्तींनी कार्ड काढून मशिनवर आपला पीनकोड क्रमांक टाकला आणि पेमेंट करून निघून गेले. त्याच वेळी पाचशे रुपयांच्या नोटा मोजणाऱ्या तरुणावर नजर गेली. त्याच्यासोबत त्याची वृद्ध आई हातात डॉक्टरांनी दिलेला काही तरी कागद घेऊन उभी होती.
रांगेत क्रमांक येताच त्या तरुणाने काउंटरवरील महिला कर्मचाऱ्याकडे पैसे दिले. पैसे न घेताच ती महिला कर्मचारी म्हणाली, ‘अहो, पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. तुम्ही वाचले नाही का? कार्ड पेमेंट करा.’ त्यावर तो तरुण उत्तरला, ‘मॅडम, माझ्याकडे पाचशेच्या नोटा आहेत. त्या स्वीकारल्या जातात की हॉस्पिटलमध्ये. माझ्याकडे कार्ड नाही. आम्ही चाकणजवळील म्हाळुंगेवरून आलोय. एक वर्षाचं बाळ अॅडमिट आहे. त्याच्या उपचाराचे डॉक्टरांनी पैसे भरायला सांगितले. आता तुम्हीच काय ते सांगा. बँकेच्या रांगेत तासभर उभे राहून पैसे काढले. आता कार्ड नाही तर करायचं काय,’ त्याच्या या प्रश्नावर संबंधित महिला असमर्थता व्यक्त करूनत शांत राहिली. त्या वेळी बिलिंग विभागात बसलेल्या एका व्यक्तीने (वरिष्ठ असावेत) त्याला काउंटरवरून बाजूला सरकायला सांगितले आणि तो हताश होऊन तरुण बाजूला झाला.

एरंडवणा भागातील एका हॉस्पिटलमधील प्रसंग. बिलिंग विभागात रांगेत उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्ती कार्ड काढूनच पेमेंट करीत होता. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडे चेकबाबत विचारणा केली. ‘चेक स्वीकारला जाईल का?’ त्यावर कर्मचाऱ्यांनी विचारले की, ‘चेक आयपीडीसाठी की ओपीडीसाठी, पेशंट कोठे आहे?’ अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यावर ‘चेक स्वीकारू; पण डॉक्टरांना विचारावे लागेल,’ असे उत्तर कर्मचाऱ्याने दिले.
एकूण काय, खासगी हॉस्पिटलने पुन्हा कार्ड पेमेंटचा पर्याय स्वीकारून चेक घेण्यासदेखील अप्रत्यक्षरीत्या नकार देण्यास सुरुवात केली आहे. चेक घेतल्यास तो ‘क्लिअर’ होईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *