facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा!

नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा!

आवाज न्यूज लाईन

मुंबई-नोटाबंदी योग्य की अयोग्य यावर अर्थ व राजकीय वर्तुळात दोन टोकांवर चर्चा घडत असतानाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर यांनी या निर्णयाचे ठाम समर्थन केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधातील ‘पाचशे व एक हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चांगल्या हेतूने आहे. त्यात काहीही वाईट हेतू दिसत नाही. देशातील काळ्या पैशांच्या समांतर अर्थव्यवस्थेपासून देशाला वाचवायचे असेल, तर माझ्यासह प्रत्येक नागरिकाने या निर्णयाला पाठिंबा द्यायला हवा, असे मत त्यांनी नोंदवले.

‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे अडचणी येत आहेत. मलाही बेंगळुरूमधील माझ्या नोकरांचे पगार देण्यास अडचण येत आहे. बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमुळे मलाही दररोज पैसे काढावे लागतील. सर्वांनाच काही अडचणी येतील, काही नुकसानही होईल. पण त्या सहन करायला हव्यात. देशहितासाठी आपण त्यांचा सामना करायला हवा’, असेही मत न्या. चेल्लुर यांनी नोंदवले.

बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमुळे मलाही दररोज पैसे काढावे लागतील. सर्वांनाच काही अडचणी येतील, काही नुकसानही होईल. पण माझ्यासह प्रत्येक नागरिकाने या निर्णयाला पाठिंबा द्यायला हवा.

याचिका ऐकण्यास न्यायालयाचा नकार

५०० व १ हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका ऐकण्यास गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.
५०० व १ हजाराच्या नोटा केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला रद्द ठरवल्या. अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याची व्यथा मांडणारी मनविसे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी केलेली जनहित याचिका ऐकण्यास मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. ‘सर्वोच्च न्यायालयात हा विषय आधीच प्रलंबित असल्याने तिथे जा’, असे खंडपीठाने त्यांना सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *