facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / पुलांसाठी बैठक

पुलांसाठी बैठक

आवाज न्यूज नेटवर्क

जळगाव-जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वेगेट आणि आसोदा रेल्वेगेटवरील उड्डाण पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत पुढील आठवड्यात रेल्वेच्या भुसावळ डीआरएम कार्यालयात महापालिका आयुक्त, महापौर व रेल्वे अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे.

जळगाव शहर हे मध्य व पश्चिम रेल्वे मार्गामुळे वेगवेगळ्या तीन भागांत विभागले गेले आहे. या विभाजनामुळे दुसऱ्या भागात जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागते. त्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर आसोदा रेल्वे फाटक, शिवाजीनगर उड्डाण पुल, पिंप्राळा रेल्वे गेट, तर पश्चिम रेल्वे मार्गावर दूध फेडरेशन रेल्वे गेट व आव्हाणे शिवार रेल्वे गेट फाटक आहे. या ठिकाणी होणारा वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेऊन पिंप्राळा व असोदा रेल्वे गेटवर उड्डाण पुल उभाण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वे प्रशासनाने महापालिकेला पत्र पाठवून या उड्डाण पुलांसाठी महापालिकेने ५० टक्के व राज्य शासनाने ५० टक्के निधी द्यावा, असे पत्र पाठविले होते. त्यावर महापालिकेने निधी नसल्याचे पत्र रेल्वेला पाठविले आहे. नव्या नियमानुसार रेल्वे व राज्य शासनाने हा निधी देण्याची आठवण पालिका प्रशासनाने करून दिली आहे. भुसावळ रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडून प्रस्ताव व भूमिका ऐकून घेण्यासाठी भुसावळला पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. पिंप्राळा रेल्वे फाटकावरून प्रतिदिन हजारो वाहनधारकांची वर्दळ असल्याचे मनपाने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे उड्डाण पुलाची गरज आहे. याबाबत महापालिकेने रेल्वे विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. त्यास २३ ऑगस्ट २०१३ रोजी नकाशांना रल्वेने मान्यतादेखील प्रदान केली आहे. त्यानुसार या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *