facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / मुंबई / पेंग्विन प्रकरणी सीबीआय चौकशी हवी

पेंग्विन प्रकरणी सीबीआय चौकशी हवी

आवाज न्यूज लाईन

मुंबई –भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील (राणीची बाग) पेंग्विनच्या मृत्यूनंतर नव्या गोष्टी समोर येत असून मुंबईतील प्लान्ट अँड अॅनिमल वेल्फेअर (पॉज) या स्वयंसेवी संस्थेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी केली आहे. संख्या कमी होत असल्याने ‘दुर्मिळ’ वर्गात मोडत असलेला हॅम्बोल्ट पेंग्विन पक्षी मुंबईतील प्राणी संग्रहालयासाठी आणणे, त्यासाठी माध्यम झालेल्या कंपनीचे वनस्पती अथवा प्राणी संबंधित कामाशी कोणताही संबंध नसणे यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील टोळी सहभागी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे यासाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी, हा या संस्थेचा आग्रह आहे.

पॉज या संस्थेने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे. याशिवाय राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही ही मागणी केली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये ४४४ प्राणी दगावल्याचा दावा या पत्राद्वारे करण्यात आला आहे. २०१० ते ११ या एका वर्षाच्या काळात राणीच्या बागेतील तब्बल १६१ पक्षी दगावल्याची माहितीही या पत्रामध्ये देण्यात आली आहे.

पेंग्विन व्यवहारात सहभागी असलेली हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी, त्यांनी दिलेली कागदपत्रे याची शहानिशा न करता या कंपनीला दिलेले कंत्राट यामुळे वास्तवाकडे केवळ स्थानिकच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही हेतुपुरस्सर डोळेझाक करण्यात आल्याची शक्यता पॉजचे सचिव सुनीश कुंजू यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणातील आंतरराष्ट्रीय सहभाग उघड व्हावा, यासाठी सीबीआय चौकशी गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी चौकशीनंतर उर्वरित सात पेंग्विन्स परत पाठवण्यात यावेत, नवीन प्राणी किंवा पक्षी राणीच्या बागेत आणण्यासाठी परवानगी देऊ नये, महापालिकेविरोधात तक्रार दाखल करण्यात यावी, खोटी कागदपत्रे देणाऱ्या कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात यावी आणि राणीच्या बागेची नोंदणी रद्द करावी अशा मागण्या पॉजने केल्या आहेत.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *