facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / नाशिक / बनावट कागदपत्रांद्वारे दिशाभूल

बनावट कागदपत्रांद्वारे दिशाभूल

आवाज न्यूज लाईन

नाशिक – बनावट कागदपत्रे सादर करून विजेत्या उमेदवाराचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करणाऱ्या उमेदवाराविरोधातच सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. आगामी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राजकीय जय-पराजयानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू होणे नवीन नाही. पेठ नगरपंचायतीची २०१५मध्ये स्थापना झाल्यानंतर तेथे नगरसेवकपदासाठी निवडणूक पार पडली. त्यातील एका वॉर्डात संशयित आरोपी भारती दुर्गेश मांडोळे (पिंपळाची आळी, पेठ) या निवडणुकीत पराभूत झाल्या. या वॉर्डात तुळसाबाई अंबादास फोदार निवडून आल्या. मात्र, तीन अपत्ये असल्याचे सांगत तुळसाबाई यांचे नगरसेवकपद रद्द करावे, यासाठी मांडोळे यांनी नाशिक येथे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. या अर्जाच्या सुनावणीदरम्यान मांडोळे यांनी योगेश फोदार, जयश्री फोदार आणि लक्ष्मण फोदार या नावाचे तीन जन्मदाखले सादर केले. मात्र, सदर अर्ज बनावट असल्याचे चौकशीत निष्पण्‍्ण झाले. बनावट कागदपत्रे सादर करीत सरकारची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंध‌ित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पेठ मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. संशयितांनी ही कागदपत्रे नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केल्याने पेठ नगरपंचायतीचे कर्मचारी रवींद्र शिवाजी लांडे यांनी सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांचे ते आदेश पोलिसांना प्राप्त होताच, त्यांनी भारती मांडोळे यांच्याविरोधात कलम ४६५, ४६६, ४६८ आणि ४७१नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पीएसआय म्हात्रे करीत आहेत.

सिव्ह‌िलमध्ये मारहाण
सिव्ह‌िल हॉस्पिटलच्या गेटवर मद्याची पार्टी करणाऱ्या चालकांना विक्की ठाकूर कोठे आहे, अशी विचारणा करणाऱ्या व्यक्तीस बेदम मारहाण करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. धनंजय, विजय अशी सदर व्यक्तींची नावे आहेत. हॉटेल राजदूतमागे राहणारे संतोष सोनवणे मंगळवारी सिव्ह‌िल हॉस्पिटलच्या गेटवर गेले असता
तिथे संशयित आरोपी मद्यप्राशन करीत होते. त्यांना विकी ठाकूर कोठे गेला, अशी विचारणा केली असता संबंध‌ित व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात संतोष यांच्या डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी मीरा सोनवणे यांच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद कली असून, पुढील तपास हवालदार धात्रक करीत आहेत.

चॉपरने वार
शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली असता भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोघा भावांवर चॉपरने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. निखील संजय साळवे (रचना हायस्कूलमागे, शरणपूररोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. यातील जखमी अनुप दत्तात्रय काळे व त्याचा भाऊ नयन दत्तात्रय काळे (सुशील अपार्टमेंट बिग बजारशेजारी) यांचे कॉलेजरोडवरील एस. के. कलर लॅबशेजारी भाजीपाल्याचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी दोन्ही भाऊ दुकान आवरत असताना संशयित आरोपी मद्यप्राशन करून आला. त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यास अनुपने शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली असता त्याने त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नयनने आरडाओरड केली असता संशयित आरोपीने आपल्याकडील चॉपरने अनुपच्या दंडावर तसेच मांडीवर वार केले. तसेच अनुपच्या तसेच डाव्या बोटावर वार करून पळून गेला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

कदम यांची गाडी अडविली
सातपूर : आमदार सीमा हिरे यांच्या मुलीच्या स्वागत समारंभातून पाहुणे मंडळी बाहेर पडत असताना मुख्यंमत्री देवेंद्र फडवणीस येत असल्याने गाड्या थांबविण्यात आल्या. यामुळे संतप्त झालेल्या आमदार कदम यांनी पोलिसांना एका बाजूने वाहने सोडण्याची विनंती केली. परंतु बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांनी मोठ्या साहेबांना विचारा असे सांगत नकार द‌िला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा आल्याने कदम यांना शांत राहत उभे राहणे भाग पडले.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *