facebook
Saturday , December 10 2016
Home / जळगाव / घनकचऱ्यावर प्रक्रियेची हंजीरने दर्शविली तयारी
jalgaon

घनकचऱ्यावर प्रक्रियेची हंजीरने दर्शविली तयारी

आवाज न्यूज नेटवर्क

जळगाव – महापालिकेचा बंद ‍पडलेला हंजीर कचरा प्रक्रिया प्रकल्प हंजीर बायोटेकने पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे आयुक्तांनी कंपनीच्या प्रतिनिधींना २३ नोव्हेंबर रोजी चर्चेसाठी बोलाविले आहे.

महापालिकेने सन २००७ मध्ये हंजीर बायोटेक या कंपनीला जळगाव शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा मक्ता दिला होता. जुलै २०१३ मध्ये या मक्तेदाराने प्रकल्पाचे काम अचानक बंद केले. या प्रकरणी महापालिकेने हंजीर विरूद्ध फौजदारी दावा दाखल केला आहे. नुकताच हा प्रकल्प ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने केली होती. त्यावर हंजीर बायोटेकने महापालिकेला पत्र पाठवून प्रकल्प पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. पुन्हा नवीन करार आणि सुरक्षा अनामत घेऊन प्रकल्प सुरू करण्याबाबत आयुक्त जीवन सोनवणे हे कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.

रेडीरेकनरने भाडे भरण्यास गाळेधारकांचा नकार

महापनालिकेच्या मुदत संपलेल्या १८ मार्केटमधील २१७५ गाळेधारकांकडे गेल्या ४ वर्षांचे पाचपट दंडासह भाडे थकले आहे. ही रक्कम ६० कोटींवर आहे. हे भाडे हरकतीसह रेडीरेकनरनुसार २४ नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने गाळेधारकांना केले आहे. गाळेधारकांनी मात्र, जुन्या दराने भाडे भरण्याची तयारी दर्शविली आहे.

अनधिकृत धार्मिक स्थळांना तीन दिवसांची मुदत

जळगाव शहरातील सन २००९ नंतरच्या सात धार्मिकस्थळांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने तीन दिवसांची मुदत दिली आहे. त्यासाठी आज ट्रस्टींना चर्चेसाठी बोलाविले होते. यावेळी तीन संस्थांच्या प्रतिनिधींनी स्थलांतराची तयारी दर्शविली. चर्चेवेळी आयुक्त जीवन सोनवणे व डीवायएसपी सचिन सांगळे उपस्थित होते.

Check Also

youth-festival

उमविचा युवक महोत्सव रंगणार जानेवारीत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे आयोजन १९ ते २३ जानेवारी या दरम्यान धनाजी नाना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *