facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / वर्धाः नोटा बदलायच्या कशा, या चिंतेने शेतकऱ्याची आत्महत्या
suicide

वर्धाः नोटा बदलायच्या कशा, या चिंतेने शेतकऱ्याची आत्महत्या

आवाज न्यूज लाईन

नागपूर – केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटांवर घातलेल्या बंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नव्या नोटा मिळवण्यासाठी बँका आणि एटीएमबाहेर रांगेत उभ्या असलेल्या तब्बल ३६ नागरिकांचे देशभरात बळी गेल्याची अधिकृत माहिती सरकारने दिली आहे. हातात पैसा आहे परंतु, त्याचा उपयोग करता येत नाही ही विवंचना अखेर एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतली.

पैशांचा तुटवडा असला तरी शहरी भागांतील नागरिकांना एटीएम आणि स्वाइप मशीनचा थोडा तरी आधार आहे. ग्रामीण भागांत या सुविधा उपलब्‍ध नसल्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती भीषण होत चालली आहे. अशा परिस्थ‌ितीत ‘दोन-तीन वर्षात दुष्काळामुळे पीक-पाणी नाही. दोन मुलींची लग्ने करायची आहे. माझ्या हजार पाचशेच्या नोट कोण बदलून देईल. गावातील लोकांना नमस्कार, चूकभूल माफ करावी,’ अशी व्यथा मांडत कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा गावातील साहेबराव गणपतराव पाटमासे (वय ६० वर्षे) या शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतात विष प्राशन करुन जीवनयात्रा सं‌पविली. पाटमासे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पाटमासे यांच्या पत्नीनेसुद्धा तीन वर्षांपूर्वी याच शेतात आत्महत्या केली होती.
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र पाटमासे यांच्या आत्महत्येचा नोटबंदीशी संबंध नाही, असा दावा केला. ‘पाटमासे यांच्याकडे तीन एकर शेती आणि लोहाराचा व्यवसाय होता. त्यांच्या विक्षिप्त वागण्यामुळे दोन मुली नातेवाईकांकडे निघून गेल्या होत्या. त्यांनी विमनस्क मनःस्थितीत ही आत्महत्या केली असावी,’ असे आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार ठाकूर म्हणाले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *