facebook
Sunday , December 4 2016
Home / नाशिक / ३० वर्षांनंतर १ रुपयाची नोट
one-rupees-notw

३० वर्षांनंतर १ रुपयाची नोट

आवाज न्यूज लाईन

नाशिक-देशातील नोटा टंचाईमुळे प्रेस नोटांची छपाई वाढली आहे. विशेष म्हणजे तब्बल ३० वर्षांनंतर १ रुपयाच्या नोटेची छपाई करण्यात आली आहे. सध्या व्यवहारात छोट्या नोटांची तीव्र टंचाई आहे. ती लक्षात घेऊन प्रेसमध्ये पाचशेपेक्षा छोट्या नोटांवर भर दिला जात आहे. वीस, पन्नास आणि शंभराच्या नोटा छपाई जास्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने ५००सह दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटा जास्त प्रमाणात छापण्याचे आदेश नाशिकरोड प्रेसला दिले आहेत. तसेच ऐन कामात यंत्र नादुरूस्त होण्याचे प्रसंग ओढवू नये म्हणून पुरेशी काळजी घेण्यात आली आहे. १६ नोव्हेंबरला शंभराच्या १ कोटी ९० लाख नोटा छापण्यात आल्या. शंभराच्या आणखी सव्वा कोटी आणि २०च्या दीड कोटी नोटा छापण्याचे नियोजन आहे. एक रुपयाची नोट तर तब्बल तीस वर्षांनी या प्रेसमध्ये छापण्यात आली. एक रुपयांच्या दहा लाख नोटा दोन दिवसांपूर्वी रवाना करण्यात आल्या आहेत. आठवडाभरात नाशिकरोड प्रेसमधून सुमारे पाच कोटी नोटा पाठविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

शाईसाठी उपाय
शाईची कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये म्हणून मध्यप्रदेशातील देवासमधून शाईचा पुरवठा केला गेला आहे. ही शाई कडेकोट सुरक्षेत टिनमध्ये नाशिकरोड प्रेसमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोटांसाठी वापरात येणारी शाई सामान्यांच्या व्यवहारात आणि उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईपेक्षा वेगळी असते. या शाईच्या सहाय्याने कामगार एक रूपयापासून पाचशेपर्यंतच्या नोटांची छपाई करतात. नाशिकरोड प्रेसमध्ये शाईच्या नेहमीच्या पुरवठ्यापेक्षा नोटांचे उत्पादन वाढल्याने शाईची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून तीन दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशातील देवासमधून विशेष शाई मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Check Also

news-7

सेनेचे कमबॅक; भाजप अस्वस्थ

आवाज न्यूज नेटवर्क – नाशिक – नगरपालिका निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपऐवजी शिवसेनेला झुकते माप दिल्याने महापालिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *