facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / खेळाडू विद्यार्थ्यांच्या शालेय हजेरी सवलतीत वाढ

खेळाडू विद्यार्थ्यांच्या शालेय हजेरी सवलतीत वाढ

आवाज न्यूज लाईन

अहमदनगर

इयत्ता नववी ते बारावीमधील खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेच्या उपस्थितीसाठीची सलवत वाढविण्यात आली आहे. पूर्वी या विद्यार्थ्यांना शाळेत ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक होती, ती आता ६० टक्के करण्यात आली आहे. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या पूर्वपरवानगीने वार्षिक परीक्षेस बसण्याची अनुमती मिळणार आहे.

विद्यार्थ्यास शाळेतील दैनंदिन उपस्थिती ७५ टक्के अनिवार्य आहे. उपस्थितीच्या मुद्द्यामुळे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याच्या भीतीपोटी अनेक प्रतिभावंत खेळाडू विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्पर्धेत भरीव यश संपादन करण्यासाठी, राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार व जोपसणा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी क्रीडा स्पर्धेवर भर देण्याची गरज भासू लागली आहे. यामुळे खेळाडूंना क्रीडाविषयी प्रोत्साहन, सवलती या बाबतीत प्रोत्साहन मिळते. त्यानुसार राज्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागण्यासाठी शालेय जीवनांपासूनच खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक वाटू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर, सरकारने खेळाडू विद्यार्थ्यांसाठी हे प्रमाण ७५ टक्के वरून ६० टक्के एवढे केले आहे. राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व मंडळाशी संलग्नित असलेल्या शाळामधील इयत्ता नववी ते बारावीमधील शिकणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेच्या उपस्थितीमध्ये सवलत देण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत संबंधित खेळाडू विद्यार्थ्याची शाळेतील दैनंदिन उपस्थिती किमान ६० टक्के पेक्षा कमी असल्यास त्यास संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या पूर्वपरवानगीने वार्षिक परीक्षेस बसण्याची अनुमती देण्यात येणार आहे. पूर्वपरवानगी घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची राहणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्याचा आवश्यक तपशील संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांकडे सादर करणे आवशयक आहे.

 

subscribe us on youtube

आवाज न्यूज लाईन अहमदनगर इयत्ता नववी ते बारावीमधील खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेच्या उपस्थितीसाठीची सलवत वाढविण्यात आली आहे. पूर्वी या विद्यार्थ्यांना शाळेत ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक होती, ती आता ६० टक्के करण्यात आली आहे. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या पूर्वपरवानगीने वार्षिक परीक्षेस बसण्याची अनुमती मिळणार आहे. विद्यार्थ्यास शाळेतील दैनंदिन उपस्थिती ७५ टक्के अनिवार्य आहे. उपस्थितीच्या मुद्द्यामुळे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याच्या भीतीपोटी अनेक प्रतिभावंत खेळाडू विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्पर्धेत भरीव यश संपादन करण्यासाठी, राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार व जोपसणा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी क्रीडा स्पर्धेवर…

User Rating: Be the first one !

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *