facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / क्रीडा क्षेत्राला मिळणार कॉर्पोरेट कवच

क्रीडा क्षेत्राला मिळणार कॉर्पोरेट कवच

आवाज न्यूज लाईन

औरंगाबाद :

राज्यातील क्रीडा क्षेत्राला कॉर्पोरेट क्षेत्राचे आर्थिक बळ देण्यासाठी उद्योगांनी ‘सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी’निधीतून (सीएसआर) दोन टक्के रक्कम खर्च करावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
केंद्र शासनाने उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निश्चित करण्याकरिता कंपनी अधिनियमात सुधारणा केली आहे. या कायद्यांतंर्गत ५०० कोटींपेक्षा अधिक निव्वळ मूल्य असलेल्या कंपन्या, एक हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या अथवा पाच कोटींपेक्षा अधिक नफा असणाऱ्या कंपन्यांना नफ्यातून दोन टक्के रक्कम क्रीडा क्षेत्रासाठी खर्च करणे बंधनकारक केले आहे. ‘सीएसआर फंडा’तून मिळालेला हा निधी ग्रामीण खेळ, राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त खेळ, पॅरा ऑलिम्पिक, ऑलिम्पिक खेळाच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. क्रीडा सुविधा, त्यांची देखभाल, दुरुस्ती; तसेच अन्य पायाभूत सुविधांची उभारणी प्रकल्पांचा समावेश आहे. खेळाडूंना दत्तक घेणे, अर्थ सहाय्य करणे यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

समिती करणार आराखडा

राज्यस्तरीय सीएसआर सनियंत्रण समिती नेमण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव हे समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हास्तरावरही अशी समिती असणार आहे. त्यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे सचिवपदाची जबाबदारी असेल. विभागीय क्रीडा उपसंचालक, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) व जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक, उच्च माध्यमिक) हे समितीचे तीन सदस्य असणार आहेत. ही समिती क्रीडा विषयक सीएसआर उपक्रमांचा आराखडा तयार करेल व त्यांचे व्यवस्थापनही करणार आहे. सीएसआर उपक्रम राबवताना शासकीय जमीन अथवा मालमत्ता उद्योजकांकडे हस्तांतरित करण्यात येणार नाही. उपक्रम राबवणाऱ्या उद्योगांनी घेतलेल्या दायित्वाची जबाबदारी विभागावर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीएसआरअंतर्गत प्रकल्प

– क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनीमधील पायाभूत सुविधा बळकट करणे
– क्रीडा संकुलांसाठी अद्यावत साहित्य उपलब्ध करून देणे
– क्रीडा प्रशिक्षण केंद्र, नैपुण्य क्रीडा केंद्र, क्रीडा वैद्यकीय केंद्र, फिटनेस केंद्र उभारणे
– क्रीडा संकुलांची देखभाल व दुरुस्ती
– राज्य अथवा जिल्हा क्रीडा विकास निधीस सहाय्य करणे
– विविध पातळींवर खेळांच्या स्पर्धांचे आयोजन
– उदयोन्मुख खेळाडूंना कामगिरी उंचावण्याकरिता आर्थिक सहाय्य, अशा खेळाडू, संघांना दत्तक घेणे
– खेळाडूंना त्यांच्या आवश्यकेनुसार प्रशिक्षण व अद्यावत साधनसामुग्री उपलब्ध करून देणे, त्यांच्या आहाराच्या गरजा पुरवणे
– खेळांशी निगडीत वैद्यकीय सुविधा, विमा सरंक्षण उपलब्ध करून देणे
– खेळाडूंना देशातंर्गत व देशाबाहेर प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे
– प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धी करणे
– पारितोषिक विजेत्या खेळाडूंना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *