facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / जळगाव / गिरीश महाजनांकडून खडसेंची मनधरणी

गिरीश महाजनांकडून खडसेंची मनधरणी

आवाज न्यूज लाईन

जळगाव-

विधान परिषदेच्या मतदानाला २४ तास बाकी असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी, माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जळगावात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी खडसेंची मनधरणी केली. मावळते आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, उमेदवार चंदुभाई पटेल उपस्थित होते. बंद दाराआड सुमारे पाऊणतास ही मनधरणी सुरू होती.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काट्याची लढत होत असून, अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवाराला जेरीस आणले आहे. गुरूवारी रात्री येथील एका हॉटेलमध्ये भाजप उमेदवाराने मतदारांना आमंत्रित करत मतदानाची विनंती केली. मात्र उमेदवारांचा थंड प्रतिसाद पाहता आज भाजप नेते एकनाथ खडसे जळगावात आल्याचे कळताच गिरीश महाजन, उमेदवार चंदुभाई पटेल व आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी हे खडसेंच्या मुक्ताई बंगल्यावर पोहोचले. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारापासून खडसे व त्यांचा गट अलिप्त आहे. त्याचा फटका निवडणुकीत भाजपला बसू शकतो हे लक्षात आल्याने ही भेट झाली. या भेटीत महाजन यांनी खडसेंची मनधरणी करत संपूर्ण सहकार्य मागितले. यावेळी २०१०ची निवडणूक आणि आजची यातील सर्व बाबतीत तुलना झाली. अखेर आपण पक्षासोबत असून, पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे असे खडसेंनी महाजन यांना सांगितले. पाऊणतास बंद दाराआड चर्चा झाली मात्र, महाजनांना बरेच ऐकावे लागल्याची चर्चा आहे. खडसे आणि महाजन यांचेशी संपर्क साधला असता भेट व चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *