facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / ग्रंथदिंडीत ‘बल्ले बल्ले’

ग्रंथदिंडीत ‘बल्ले बल्ले’

आवाज न्यूज लाईन

पुणे-

महाराष्ट्रात साहित्य संमेलने उदंड होतात. या संमेलनात ग्रंथदिंड्याही निघतात. पण या दिंड्यांचा ‘ताल’ पारंपरिक वाद्यांच्या पलीकडे जात नाही. ग्रंथदिंडीमध्ये ढोला-बाजाचा ताल आणि भांगडा रंगला तर…वेगळे वाटते ना ? मराठी साहित्य संमेलनाच्या सभ्यतेमध्ये कदाचित हे बसणार नाही, पण अशी दिंडी शुक्रवारी निघाली आणि पंजाबी-मराठी भाषा प्रेमी व साहित्यिक ढोल-बाज्याच्या तालात भांगडामय झाले. ‘बल्ले बल्ले’ करण्याची अनोखी संधीच होती ती. निमित्त होते, सरहद संस्थेतर्फे आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे. पंजाब येथून निघालेली ग्रंथदिंडी पुण्यात पोहोचल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद ते संमेलन स्थळ असलेल्या गणेश कला क्रीडा रंगमंच या मार्गावर दिंडी काढण्यात आली. संमेलनाध्यक्ष डॉ. सुरजितसिंग पातर यांचे परिषदेत औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर महापौर प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत दिंडीला सुरुवात झाली.

‘भाषा अनेक, देश एक,’ असा फलक हाती घेतलेले विद्यार्थी, पंजाबी-मराठी भाषा प्रेमी व साहित्यिक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. २२ भाषांतील ग्रंथांचा रथ दिंडीमध्ये होता. डॉ. पातर, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे, ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व संजय नहार यांनी हाताची साखळी करून ‘भाषा अनेक, देश एक,’ असा संदेश दिला.

दिंडी संमेलनस्थळी पोहोचल्यानंतर डॉ. आमटे यांनी स्वागत केले. त्यानंतर ढोल-बाजाच्या ठेक्यावर ‘बल्ले बल्ले’ करण्याचा मोह पंजाबी भाषिक आवरू शकले नाहीत. पंजाबी संस्कृतीतील मोकळेपणा पाहून सबनीस, आमटे प्रा. जोशी यांनीही ठेका धरला. त्यानंतर सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले. पंजाबी भाषिक स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक पंजाबी नृत्याने वातावरणाचा नूर पालटला.

आवाज न्यूज लाईन पुणे- महाराष्ट्रात साहित्य संमेलने उदंड होतात. या संमेलनात ग्रंथदिंड्याही निघतात. पण या दिंड्यांचा ‘ताल’ पारंपरिक वाद्यांच्या पलीकडे जात नाही. ग्रंथदिंडीमध्ये ढोला-बाजाचा ताल आणि भांगडा रंगला तर...वेगळे वाटते ना ? मराठी साहित्य संमेलनाच्या सभ्यतेमध्ये कदाचित हे बसणार नाही, पण अशी दिंडी शुक्रवारी निघाली आणि पंजाबी-मराठी भाषा प्रेमी व साहित्यिक ढोल-बाज्याच्या तालात भांगडामय झाले. ‘बल्ले बल्ले’ करण्याची अनोखी संधीच होती ती. निमित्त होते, सरहद संस्थेतर्फे आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे. पंजाब येथून निघालेली ग्रंथदिंडी पुण्यात पोहोचल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद ते संमेलन स्थळ असलेल्या गणेश कला क्रीडा रंगमंच या मार्गावर दिंडी काढण्यात आली. संमेलनाध्यक्ष डॉ. सुरजितसिंग पातर यांचे परिषदेत…

User Rating: Be the first one !

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *