facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / अहमदनगर / नगर झेडपीचे अध्यक्षपद खुले

नगर झेडपीचे अध्यक्षपद खुले

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणात पुन्हा बदल झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार राज्यातील अकरा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी फेरसोडत काढण्यात आली. या सोडतीत नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आता खुले झाले आहे. जून महिन्यात जाहीर झालेल्या आरक्षणानुसार हे पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले होते. या बदलामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या पुरुष सदस्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची आरक्षण सोडत मागील जून महिन्यात काढण्यात आली होती. परंतु, सोलापूर व लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी लागोपाठ दोनदा अध्यक्षपद आरक्षित झाल्याने या सोडतीत सुधारणा करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. त्यानुसार आज अकरा जिल्ह्यांतील सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी फेरसोडत काढण्यात आली. या सोडतीत नगर जिल्हा परिषदेचे महिला अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले आहे. अध्यक्षपद आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. या पदासाठी पुरुष सदस्यही प्रयत्न करू शकतात. मागील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीच्या मंजूषा गुंड यांना संधी मिळाली. त्यानंतरही पुन्हा महिलेसाठीच हे पद आरक्षित झाल्याने चौथ्यांदा अध्यक्ष होण्याची संधी महिलांना मिळणार होती. परंतु, नव्याने निघालेल्या या सोडतीत पद खुले झाल्याने पुरुष सदस्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

काँग्रेसला झटका

जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी नगरपालिका अस्तित्वात आल्याने जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समित्यांचे गणांची फेररचना होऊन आरक्षणही जाहीर झाले आहे. या आरक्षणात सध्याचे सत्ताधारी काँग्रेस आघाडीला जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज सदस्यांचे गट एकतर आरक्षित झाले आहेत किंवा तेथे महिलांसाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे या दिग्गज सदस्यांचा आधीच हिरमोड झाला होता. त्यात आता पुन्हा अध्यक्षपद फेरसोडतीत खुले झाल्याने या मंडळींचा अधिकच हिरमोड झाला आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *