facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / नाराजी दोन हजारांच्या सुट्या पैशांसाठी

नाराजी दोन हजारांच्या सुट्या पैशांसाठी

आवाज न्यूज लाईन

जळगाव –

एटीएम बँकांमधून नागरिकांच्या हातात पैसे येऊ लागले असले, तरी हातात पडत असलेल्या दोन हजाराच्या नोटांचे सुटे लवकर मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.

पाचशे व हजारचे चलन बाद होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटला असून, नागरिकांच्या हातात पैसा येऊ लागल्याने हळूहळू बाजारपेठेत व्यवहार वाढत आहेत. नागरिक डेबिट वा क्रेडीट कार्डचा वापर करू लागले आहेत. परिणामत: बँकाकडे व्यापारीवर्ग स्वाइप मशीनची मागणी करत आहे. एकट्या जळगाव पीपल्स बँकेकडे २८ मशीनची मागणी आल्याचे बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी मटाशी बोलतांना सांगितले. शुक्रवारी बँकांच्या एटीएमबाहेर रांगा दिसत असल्या, तरी आता गर्दीचा भर बराचसा ओसरलेला दिसत आहे. स्टेट बँकेबाहेर आजदेखील गर्दी होती. बँका नोटांच्या उपलब्धतेनुसार ग्राहकांना नोटा उपलब्ध करून देत आहे मात्र, या नोटा दोन हजाराच्या असल्याने या नोटांचे सुटे होत नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. बाजारात खरेदीसाठी गेल्यानंतर तीनशेची खरेदी झाल्यास उर्वरीत सतराशे रुपये परत देण्यास दुकानदार नाखूष असतात. त्यामुळे आज तरी उदंड जाहले दोन हजार म्हणण्याची वेळ आलेली आहे. शंभराच्या नोटा या पेट्रोल पंपांवरून देखील गायब झालेल्या आहेत. त्यामुळे त्या उपलब्ध होणे गरजेचे आहे. आजपासून जी. एस. मैदानावर सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनात शेतकरीवर्गाला दोन हजाराचे सुटे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळाले.
पेट्रोल पंपांना सूचना प्राप्त

पेट्रोल पंपावर आता पैसे मिळतील असे जाहीर केले गेले असले, तरी आज कोठेही सुरुवात झालेली दिसून आली नव्हती. याबाबत प्रकाश चौबे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला तशा सूचना कंपनीकडून आल्या असल्याचे मान्य करत याबाबत बँकेकडून तांत्रिक पूर्तता होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *