facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / मुंबई / नोटबंदी: स्ट‍ॅम्प ड्युटी महसुलात ३७ टक्के घट

नोटबंदी: स्ट‍ॅम्प ड्युटी महसुलात ३७ टक्के घट

नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका राज्य सरकारच्या मालमत्ता स्टॅम्प ड्युटीतून मिळणाऱ्या उत्पन्नालाही बसला असून या महसुलात ३७ टक्के घट झाली आहे. राज्य सरकारला मालमत्ता नोंदणी व स्टॅम्प ड्युटी महसुलापोटी दररोज साधारण ६५ कोटी रुपये मिळतात. मात्र हा आकडा घटून ४२ कोटी रुपयांवर आल्याची माहिती रजिस्ट्रेशन व कंट्रोलर महानिरीक्षक एन. रामस्वामी यांनी दिली.

स्टॅम्प ड्युटीसह अन्य भरणा संगणकीय पद्धतीने होत असतानाही उत्पन्न घटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोज होणाऱ्या नोंदणीची संख्या ७,३००वरून चार हजारावर आली आहे. या विभागाने २०१५-१६मध्ये २१,७६७ कोटी रुपये महसूल मिळविला होता. कागदपत्रे हाताळणीचे २० रु. शुल्क रोखीऐवजी डिमांड ड्राफ्टने घेण्याचे आदेश देऊनसुद्धा त्याला कमी प्रतिसाद आहे. मालमत्ता व्यवहारात मोठ्या रकमा रोखीत दिल्या जातात. त्याची कागदोपत्री नोंद होत नाही. त्यामुळे ५०० व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा या नोंदणीवर विपरीत परिणाम झाला आहे.

रांगा संपेना…

नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नवव्या दिवशीसुद्धा पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा संपत नसल्याचे चित्र आहे. विलेपार्ले येथील निवृत्त बँक कर्मचारी मधुसूधन चव्हाण यांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे सांगताना अंमलबजावणीमध्ये मात्र केंद्र सरकार कमी पडल्याचे प्रतिपादन केले.

विक्रोळी येथे टपाल कार्यालयात आलेल्या अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलेने दोन हजार रुपये बदलून घेतले. मोदी यांनी ५० दिवसांचा अवधी दिला असला, तरी त्यापैकी दहा दिवस संपले आहेत, आता ४० दिवस उरले असून तेसुद्धा निघतील व त्यानंतर ‘अच्छे दिन’ येतील असा विश्वास व्यक्त केला. आम्ही रांगेत नोटा बदलण्यासाठी नव्हे, तर देश बदलण्यासाठी आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *