facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / लग्नात बॅँकेचे विघ्न

लग्नात बॅँकेचे विघ्न

आवाज न्यूज लाईन

औरंगाबाद

विवाह समारंभ असेल त्यांना अडीच लाख रुपये काढता येतील, असे उपसचिव शक्तिकांत दास यांनी गुरुवारी जाहीर केले होते. मात्र, याची लेखी सूचना बँकांपर्यंत न पोचल्याने अनेक बँकांमध्ये पैसे काढण्यावरून वाद झाले. सिडकोतील एका बँकेत एका मुलीने स्वतःच्या विवाहासाठी पैसे मागितले, पण बँकेने लेखी आदेश नसल्याचे कारण सांगितले आणि केवळ २४ हजारच काढता आले.
शुक्रवारी दुपारी सिडको एन नऊ येथील सेंट्रल बँकेच्या शाखेसमोर मोठी गर्दी होती. बँकेचे कामकाज अजून सुरू होते, पण आत गर्दी झाल्यामुळे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. तेवढ्यात आतून एक मुलगी बाहेर आली. सिडको एन – नऊ परिसरातच ती राहते. तिच्यासोबत काही अन्य नागरिक बाहेर आले. कडक उन्हात बाहेर उभारलेल्या काही महिला, ज्येष्ठ नागरिक आत सोडावे, अशी विनंती करत होते, पण आत आधीपासूनच गर्दी होती. त्यामुळे काही वेळ थांबा, असे सुरक्षारक्षक आणि तैनात पोलिस सांगत होते. तिथे उभे असलेल्यांपैकी श्रीमती पाटील यांनी सांगितले, ‘आता जी मुलगी गेली. तिचे लग्न आहे. लग्नासाठी पैसे काढण्यासाठी ती आली होती. बँकेत मागितलेली रक्कम देण्यास व्यवस्थापनाने नकार दिला. आम्हाला २४ हजार रुपयेच देण्याची परवानगी आहे. असे सांगितले गेले. तिने तेवढेच पैसे नेले.’ बँकेत गर्दीत दोन तास उभे असलेल्यापैकी एकाने सांगितले. त्या मुलीने बँकेकडे अधिकच्या पैशाची मागणी केली होती. सरकारने विवाहासाठी अडीच लाख रुपये देण्यासंदर्भात जाहीर केले आहे. मग तुम्ही का देत नाहीत ? असे विचारल्यानंतर ते सगळे तिकडे जाहीर झाले. अजून आमच्यापर्यंत लेखी काही आले नाही. लेखी सूचनेनुसार २४ हजार रुपये काढता येतील,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारचा अनुभव शहरातील अनेक बँकांमध्ये येत आहे. लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता येतील, असे जाहीर केले. त्यासाठी सोबत लग्नपत्रिका आणण्याची सक्ती केली गेली. एखाद्याने त्याची पूर्तता केली तर त्यांचेच पैसे देण्यास काय हरकत आहे, असा सवाल उपस्थितांनी उपस्थित केला. उन्हात रांगेत उभे असलेल्या नागरिकांनी या त्रासाबद्दल अगदी सरकारपासून बँकेपर्यंत सर्वांना दोष दिला पण घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.

आलेल्या प्रत्येक ग्राहकाची सोय व्हावी यासाठी आम्ही पैसे काढण्यासाठी ४००० रुपयांची मर्यादा ठेवली आहे. दुपारी आलेल्या एका मुलीने विवाहपत्रिका आणली होती. तिने मागणी केल्याप्रमाणे नियमानुसार २४ हजार रुपये देण्यात आले. अधिकची मागणी केली असती तर निश्चितच नियमानुसार रक्कम दिली असती. – राकेशकुमार, प्रभारी शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, सिडको एन-नऊ

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *