facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / जळगाव / विधान परिषदेसाठी आज मतदान

विधान परिषदेसाठी आज मतदान

आवाज न्यूज लाईन

जळगाव

विधान परिषद जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी आज (दि.१९) मतदान होणार आहे. त्यासाठी ५४९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात सात मतदान केंद्रे असून, त्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येऊन दुपारी मतपेट्या आणि कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर सहा याप्रमाणे कर्मचारी नियुक्त झालेले आहेत. संपूर्ण मतदान केंद्र सीसीटीव्हीच्या निगराणीत असेल. शिवाय केंद्राबाहेरदेखील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीच्या वेळी मतदारास निवडणूक ओळखपत्र किंवा संबंधित स्वराज्य संस्थेचे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे. इतर ओळखपत्र चालणार नाही. मतपत्रिकेवर कोणतेही चिन्ह, स्वाक्षरी अथवा खूण करू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. भाजपचे चंदुभाई पटेल यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार अॅड. विजय भास्करराव पाटील यांनी भाजप उमेदवारासमोर आव्हान उभे केले असल्याने आतापर्यंत सहज वाटणारी निवडणूक ही अटीतटीकडे झुकलेली आहे. भाजप उमेदवाराच्या यशसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्यात तळ ठोकून असून, मतदारांशी संपर्क साधत आहेत. भाजप उमेदवार हा सर्वपक्षीय असल्याने गिरीश महाजन हे सर्व पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून आहेत. अपक्ष उमेदवार अॅड. विजय पाटील यांनीदेखील आपण सर्व मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचल्याचे सांगितले. सन २०१० मध्ये झालेली विधान परिषदेची निवडणूक देशभर गाजली होती. यंदा या निवडणुकीत एक अपक्ष उमेदवार भाजपसमोर आव्हान देत आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *