facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / मुंबई / सरकारी योजनांचे त्रयस्थ ऑडिट

सरकारी योजनांचे त्रयस्थ ऑडिट

मुंबई: राज्य सरकारकडून सर्वसामान्यांच्या हितासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्याचा जनतेला खरंच फायदा होतो की, मधल्या मध्ये काहीजण स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात, हे तपासण्यासाठी सरकारनेच आता त्रयस्थ संस्था नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘थर्ड पार्टी ऑडिट’मधून योजनांचा खर्च नेमका कसा करावा याचा ताळेबंद तयार होईलच. शिवाय, या संस्थांनी तयार केलेल्या प्रगतीपुस्तकात ज्या विभागाचे अधिकारी ‘अव्वल’ ठरतील त्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून उच्च शिक्षणासाठी परदेश दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे.सरकारी योजनांचा निधी नेमका कशाप्रकारे खर्च होत आहे आणि त्यातून काय फायदा होतो याचा ताळेबंद तयार झाल्यास संबंधित खर्चाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्य आहे. त्यामुळे वित्त विभागाने प्रत्येक खात्याच्या कामगिरीचे मोजमाप करण्याचे ठरवले आहे. यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येणार असून या संस्थांमध्ये ‘अ’ दर्जाची विद्यापीठे, राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या संस्था ‌किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीच्या संस्थांचा सहभाग असेल. वित्त विभागातील प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील एक समिती या निविदा काढून त्रयस्थ संस्था निवडणार आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *