facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / ५०० ची नोट अजून दुर्मिळच

५०० ची नोट अजून दुर्मिळच

आवाज न्यूज लाईन

पुणे—बँकांबाहेर दिसणारी गर्दी शुक्रवारी बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसून आले. तरीही एटीएमसाठीची गर्दी कायम होती. अजूनही शहरातील बहुतांश एटीएम बंदच असून, मोजक्याच एटीएमबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. दरम्यान, शहरातील बँकांमध्ये आजही शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा कायम होता. पुण्यातील बँकांना अजूनही पाचशेची नोट उपलब्ध झालेली नाही.

शहरातील बहुतांश बँकांना शुक्रवारीही फक्त दोन हजार रुपयांच्या नोटांचाच पुरवठा झाला. शंभरच्या नोटांची अवघी काही बंडल बँकांना देण्यात आली. त्यामुळे खातेदारांना केवळ दोन हजारच्याच नोटा देण्यावाचून पर्याय राहिला नव्हता, तर काही बँकांनी बारा हजार रुपये देण्याऐवजी सहा किंवा सात हजार रुपयेच देण्याचा निर्णय घेऊन प्रत्येकाला शंभराच्या काही नोटा मिळू शकतील, अशी व्यवस्था केली होती; परंतु एखादा चालू खात्याच्या (करंट अकाउंट) ग्राहकाने ५० हजारांची मागणी केल्यास या नियोजनात गडबड होत होती. दोन हजार रुपयांचे सुटे पैसे मिळणे अवघड असल्याने काही ठिकाणी नागरिक आणि बँकेचे कर्मचारी यांच्यात खटके उडत होते.

कार्यरत एटीएमची संख्या वाढली

शहरातील अनेक एटीएम शुक्रवारी कार्यरत झाली होती. शाखांलगत असलेल्या ऑनसाइट एटीएमबरोबरच शाखेपासून दूर असलेली ऑफसाइट एटीएमही कार्यरत झाली होती. परिणामी या एटीएम बाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही एटीएममध्ये शंभरच्या नोटांबरोबरच दोन हजार रुपयांच्या नोटाही भरण्यात आल्या होत्या.

 

 

आवाज न्यूज लाईन पुणे---बँकांबाहेर दिसणारी गर्दी शुक्रवारी बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसून आले. तरीही एटीएमसाठीची गर्दी कायम होती. अजूनही शहरातील बहुतांश एटीएम बंदच असून, मोजक्याच एटीएमबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. दरम्यान, शहरातील बँकांमध्ये आजही शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा कायम होता. पुण्यातील बँकांना अजूनही पाचशेची नोट उपलब्ध झालेली नाही. शहरातील बहुतांश बँकांना शुक्रवारीही फक्त दोन हजार रुपयांच्या नोटांचाच पुरवठा झाला. शंभरच्या नोटांची अवघी काही बंडल बँकांना देण्यात आली. त्यामुळे खातेदारांना केवळ दोन हजारच्याच नोटा देण्यावाचून पर्याय राहिला नव्हता, तर काही बँकांनी बारा हजार रुपये देण्याऐवजी सहा किंवा सात हजार रुपयेच देण्याचा निर्णय घेऊन प्रत्येकाला शंभराच्या काही नोटा मिळू शकतील, अशी…

0

User Rating: Be the first one !

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *