facebook
Thursday , December 8 2016
Home / नागपूर / खास १२ सुविधा एक्स्प्रेस
train-news

खास १२ सुविधा एक्स्प्रेस

आवाज न्यूज लाईन

नागपूर- प्रवाशांच्या सोईसाठी पुणे- कामाख्या दरम्यान २१ नोव्हेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान १२ साप्ताहिक विशेष सुविधा एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहेत.
या गाड्यांचा तपशील असा- ८२५०५ पुणे- कामाख्या- ही गाडी २४ नोव्हेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान दर गुरुवारी पुण्यावरून १०.३० वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी १५.२५ वाजता कामाख्या येथे पोहचेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे २५ नोव्हेंबर व २, ९, १६, २३ व ३० डिसेंबर रोजी १.२० वाजता नागपूरला येईल आणि १.३० वाजता पुढे रवाना होईल.
८२५०६ कामाख्या- पुणे- ही विशेष गाडी २१ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान दर सोमवारी कामाख्या येथून २३.०० वाजता निघेल व चौथ्या दिवशी २.४५ वाजता पुणे येथे पोहचेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी बुधवारी म्हणजे २३, ३० नोव्हेंबर तसेच ७, १४, २१ व २८ डिसेंबर रोजी ११.१४५ वाजता नागपूरला येईल आणि ११.२५ वाजता पुढे रवाना होईल. न्यू बोंगईगाव, न्यू कुचबिहार, न्यू जलपाईगुडी, किशनगंज, मालदा टाईन, अंदल, आसनसोल, पुरुलिया, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुगुडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, भुसावळ, नाशिक व पनवेल येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे. या गाडीला १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, १ द्वितीय साधारण श्रेणी व २ एसएलआर असे कोच राहतील. प्रवाशांनी या विशेष सुविधा गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने केले आहे.

Check Also

wari

नागपुरात रंगणार ‘शिक्षणाची वारी’

विदर्भातील शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेल्या शैक्षणिक प्रयोगांचे प्रदर्शन नागपुरात गुरुवारपासून सुरू होणार आहे. शिक्षणाची वारी म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *