facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / पेट्रोलपंपांवरून तूर्त कॅश नाही
cash-on-petrol-pump

पेट्रोलपंपांवरून तूर्त कॅश नाही

आवाज न्यूज लाईन

नाशिक – पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बँकांमधील गर्दी कमी होत नसल्यामुळे केंद्र सरकारने आता पेट्रोलपंपांमध्ये डेबिट कार्डधारकांना दोन हजार रुपये काढता येणार असल्याची घोषणा केली. पण, ही सुविधा तूर्त नाशिक जिल्ह्यातील ८०० हून अधिक असलेल्या पेट्रोलपंपांवर मिळणार नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. जिल्ह्यात एकाही पेट्रोलपंपावर स्टेट बँकेचे स्वाइप मशिन नाही. त्यामुळे इतर खासगी बँकांचे स्वाइप मशिन असणाऱ्या या पेट्रोलपंपांवर ही सुविधा मायक्रो स्वाइप मशिन बसवल्यानंतर मिळणार आहे. त्यासाठी तीन दिवसांचा अवधी सांगितला असला, तरी त्याला वेळ लागणार आहे.

जिल्ह्यात भारत व इंडियन आॅइल या दोन्ही पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या पेट्रोलपंपांवर एचडीएफसीचे स्वाइप मशिन आहे, तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर आयसीआयसी बँकेचे स्वाइप कार्ड आहे. या दोन्ही बँकांनी दिलेल्या या मशिन कॅश काढण्यासाठी उपयोगी नाहीत. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या मशिन पेट्रोलपंपांवर द्याव्या लागणार असून, त्यानंतर या पंपांवर ही सुविधा मिळणार आहे. स्टेट बँकेच्या स्वाइप मशिन असलेल्या देशभरातील २५०० पेट्रोलपंपांवर ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या पेट्रोलपंपांवरून शुक्रवारपासून दोन हजार रुपये काढता येत आहेत.
कॅशचा प्रश्न

पेट्रोलपंपांवर पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना सुट्या नोटांची मोठी टंचाई जाणवू लागली आहे. दोनशे रुपयांचे पेट्रोल घेणाऱ्यांना तीनशे रुपयांचे सुटे पैसे आल्यानंतर ते दिले जात आहेत. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर करणाऱ्या या पेट्रोलपंपांवर सुट्या पैशांचा प्रश्न कायमच राहणार आहे.

बँक कॅश देईल, पण केव्हा?

सध्या बँकांतील गर्दीमुळे पेट्रोलपंपधारकांना आपला भरणा करण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बँकेने कॅश दिली, तर त्यासाठी किती वेळ पेट्रोलपंपधारक रांगेत उभे राहील, हा प्रश्न आहे. त्यासाठी स्वतंत्र काही उपाययोजना केली गेली, तरच पेट्रोलपंपधारक ही मागणी पूर्ण करू शकेल.

जिल्ह्यातील भारत, हिंदुस्थान व इंडियन आॅइलच्या पेट्रोलपंपावर स्टेट बँकेचे स्वाइप मशिन नाही. या सर्व पंपांवर एचडीएफसी व आयसीआयसीचे स्वाइप मशिन आहे. त्यामुळे मायक्रो स्वाइप मशिन दिल्यानंतरच पेट्रोलपंपांवर ही सुविधा मिळणार आहेत.

-नितीन धात्रक, पेट्रोलपंपचालक

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *