facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / बँकांच्या रांगा घटल्या, एटीएमच्या वाढल्या!
nashik-atm-news

बँकांच्या रांगा घटल्या, एटीएमच्या वाढल्या!

आवाज न्यूज लाईन

नाशिक-

पाचशे व हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकेत पैसे भरण्यासाठी तसेच बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या रांगा शुक्रवारी कमी झाल्या असल्या तरी एटीएमसमोरील रांगा मात्र वाढल्या आहेत.

औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना असलेल्या साप्ताहिक सुटीमुळे आज पुन्हा बँकांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नोटा रद्द झाल्यानंतर बँकांची सेवा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर अव्याहत सुरूच आहे. पैसे भरणे, काढणे व नोटा बदलून देणे, याव्यतिरिक्त बँकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. या नऊ दिवसांत शनिवार, रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या, तर सोमवारी मात्र एका दिवसाची सुट्टी मिळाली. त्यानंतर मात्र बँका सलग सुरू आहेत. आता या रविवारी बँका सुरू राहतील की नाही, याबाबत कोणतीही घोषणा नसल्यामुळे शनिवारी या गर्दीत वाढ होणार आहे.
जिल्ह्यातील बँकांची एटीएमची एकत्रित माहिती नसल्यामुळे ६५०हून अधिक एटीएम असल्याचे बोलले जात होते. पण आता बँकांच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सर्व बँकांकडून माहिती घेतल्यानंतर हा आकडा ९०३ असल्याचे समोर आले आहे. यातील काही एटीएमवर आता दोन हजारांच्या नोटा मिळू लागल्यामुळे बँकांवरील भार कमी होणार आहे.
कॅश उपलब्ध
सुरुवातीला नोटांच्या कमी उपलब्धतेमुळे अनेक बँकांना त्रास सहन करावा लागला. वाढलेली गर्दी व कमी कर्मचारी संख्या यामुळे बँकांसमोर अडचणी असताना कॅश शॉर्टेजच्या प्रॉब्लेममुळे ग्राहकांशी हुज्जत व वादही सुरू झाले होते. पण आता कॅश प्रॉब्लेम बऱ्यापैकी सुटल्यामुळे बँकांना दिलासा मिळाला आहे. स्टेट बँकेकडे ३१७ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत, तर इतर बँकांकडे पैसे आले आहेत.
दोन हजार मर्यादेचा गर्दीवर परिणाम
नोटा बदलण्यासाठी होणारी गर्दी व त्यातून गैरफायदा घेण्याचे प्रकार यामुळे बँकाना होणारा त्रास शुक्रवारी कमी झाला. नोटा बदलीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दोन हजार रुपयेच मिळणार असल्यामुळे त्याचाही गर्दीवर परिणाम झाला, तर दुसरीकडे शाईमुळेही गर्दी ओसरलेली जाणवली.

स्टेट बँकेत ४१ कोटी

स्टेट बँकेच्या ग्रामीण ३५ शाखांमध्ये ४१ कोटी ९८ लाख रुपये जमा झालेत. तर एक कोटी ५८ लाखांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. विशेष म्हणजे ३० कोटी २० लाखांचे पेमेंटही करण्यात आले. त्याचप्रमाणे एटीएमवरुन दोन कोटी २६ लाख रुपये ग्राहकांनी काढले. या बँकेचे ६२ एटीएम असून त्यातील ६० एटीएम सुरू झाले आहेत. त्यातील १७ एटीएमवर दोन हजारांच्या नोटा काढण्याची व्यवस्था सुरू झाली आहे. तर ४३ एटीएमवर अद्याप शंभरच्या नोटांचा भरणा करण्यात येत आहे. अशीच स्थिती थोड्या-अधिक फरकाने इतर बँकांची आहे.

आवाज न्यूज लाईन नाशिक- पाचशे व हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकेत पैसे भरण्यासाठी तसेच बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या रांगा शुक्रवारी कमी झाल्या असल्या तरी एटीएमसमोरील रांगा मात्र वाढल्या आहेत. औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना असलेल्या साप्ताहिक सुटीमुळे आज पुन्हा बँकांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नोटा रद्द झाल्यानंतर बँकांची सेवा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर अव्याहत सुरूच आहे. पैसे भरणे, काढणे व नोटा बदलून देणे, याव्यतिरिक्त बँकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. या नऊ दिवसांत शनिवार, रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या, तर सोमवारी मात्र एका दिवसाची सुट्टी मिळाली. त्यानंतर मात्र बँका सलग सुरू आहेत. आता या रविवारी बँका सुरू राहतील की नाही, याबाबत कोणतीही घोषणा नसल्यामुळे…
User Rating: Be the first one !

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *