facebook
Thursday , December 8 2016
Home / नाशिक / मुक्या जिवांवर उपासमारीची वेळ
dog-image

मुक्या जिवांवर उपासमारीची वेळ

आवाज न्यूज लाईन

नाशिक – पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे एकीकडे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत असतानाच या निर्णयाचा फटका मुक्या प्राण्यांनादेखील बसल्याचे दिसून येत आहे. शहरातील आजारी असलेली मोकाट जनावरे, तसेच पाळीव जनावरांचा सांभाळ करणाऱ्या शेल्टर हाउसला भेडसावणाऱ्या आर्थिक चणचणीमुळे येथील मुक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामु‍ळे ‘आवास’सारख्या मुक्या प्राण्यांचे आश्रयस्थान असलेल्या व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. येथील बैल, घोडे, कुत्रे, मांजर, वानर यांसारख्या प्राण्यांना दररोज चारा, तांदूळ, डॉग फूड आदी प्रकारचे खाद्य लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संस्थेला सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने आणि कोणी उधारदेखील देत नसल्याने या मुक्या प्राण्यांना एक वेळचे जेवण पुरविणेदेखील अवघड बनले आहे. नोटाबंदीच्या गडबडीत दात्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली असल्याची माहिती ‘आवास’ या प्राणी शेल्टरच्या भारती जाधव यांनी दिली. त्यामुळे अशा संस्थाना कुठेतरी दिलासा दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आवाज न्यूज लाईन नाशिक - पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे एकीकडे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत असतानाच या निर्णयाचा फटका मुक्या प्राण्यांनादेखील बसल्याचे दिसून येत आहे. शहरातील आजारी असलेली मोकाट जनावरे, तसेच पाळीव जनावरांचा सांभाळ करणाऱ्या शेल्टर हाउसला भेडसावणाऱ्या आर्थिक चणचणीमुळे येथील मुक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामु‍ळे ‘आवास’सारख्या मुक्या प्राण्यांचे आश्रयस्थान असलेल्या व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. येथील बैल, घोडे, कुत्रे, मांजर, वानर यांसारख्या प्राण्यांना दररोज चारा, तांदूळ, डॉग फूड आदी प्रकारचे खाद्य लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संस्थेला सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने आणि कोणी उधारदेखील देत नसल्याने…

User Rating: Be the first one !

Check Also

खो-खोत जय हिंद, शिवभक्त जेते

जिल्हा खो-खो संघटना व समर्पण नाशिकतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेल्या अखिल भारतीय आमंत्रितांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *