facebook
Monday , December 5 2016
Home / नागपूर / मेयोत अखेर बहुप्रतीक्षित डायलिसीस केंद्र सुरू
news-5

मेयोत अखेर बहुप्रतीक्षित डायलिसीस केंद्र सुरू

आवाज न्यूज लाईन

नागपूर – दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने हजारो रुग्णांचा सध्या डायलिसीसवर श्वास सुरू आहे. सुपरमधील डायलिसीस केंद्र वगळता बाहेचे महागडे उपचार गरिबांना परवड नाहीत. त्यामुळे उशिरा का होईना सरकारच्या हृदयाला आता पाझर फुटला आहे. मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीनंतर अत्यंत माफत दरांत रुग्णांना डायलिसीसचा आधार मिळणार आहे.

पीपीपी तत्त्वावर मेयोत १२ हिमोडायलिसीस उपकरणे शुक्रवारी सेवेत दाखल झाले. मेयोत पूर्वी दोन हिमोडायलिसीस उपकरणे होती. मात्र, दोन्ही उपकरणांत तांत्रिक बिघाड झाल्यापासून तब्बल वर्षभरापूर्वी ही उपकरणे बंद पडली. अखेर आता सरकारने पुण्यातील यशस्वी ग्रुपच्या मदतीने पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्त्वावर १२ उपकरणे सेवेत रुजू केली आहेत. यातील दोन हिमोडायलिसीस एचआयव्ही एड्सची बाधा झालेल्या रुग्णांसाठी राखीव असतील. या बारा यंत्राद्वारे २४ रुग्णांना डायलिसीसची सोय होणार आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे कवच देऊन दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींनाही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रूग्णाला डायलिसिसशिवाय पर्याय नसतो. यातील अनेकांना आठवड्यातून दोन दिवस डायलिसिस करावे लागते. विदर्भात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटीत ही सोय आहे. तिथे रोज १६ रुग्णांना डायलिसीसची सोय मिळते. परंतु रुग्णांची संख्या लक्षात घेता अनेकांवर प्रतीक्षा अथवा खासगीचा रस्ता धरण्याची वेळ येते. खासगीत एका डायलिसीस पोटी ५ ते १० हजारांपर्यंतचा खर्च येतो. त्यामुळे मेयोत सेवेत दाखल झालेल्या या सुविधेने गरिबांना अत्यंत माफक दरांत हे उपचार मिळणार आहेत.

मेयोच्या अपघात विभागाच्या पहिल्या माळ्यावर ‘पीपीपी’ तत्त्वावर जर्मन रिनल केअर प्रा. लिमिटेडच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाणार आहे. त्याचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होणार होते. परंतु आचारसंहितेमुळे ते मागे पडले. हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने तक्रारी वाढल्याने अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वाहाणे यांनी शुक्रवारी हे केंद्र सेवेत दाखल केले. सध्या या केंद्रात तीन तंत्रज्ञ व निवासी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उद्घाटन पुढील आठवड्यात

मेयोच्या या डायलिसीस केंद्राचे औपचारिक उद्घाटन पुढील आठवड्यात अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते होईल. परंतु रुग्ण हिताला प्राधान्य देऊन हे केंद्र शुक्रवारपासून सेवेत रुजू केल्याचे अधिष्ठाता डॉ. वाहणे यांनी नमूद केले.

Check Also

news-8

प्रा. साईबाबा खटला; १ डिसेंबरला अंतिम युक्तिवाद

आवाज न्यूज नेटवर्क – नागपूर – कथित माओवादीसमर्थक असल्याचा आरोप असलेले दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *