facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० क्रुझ येणार: गडकरी

आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० क्रुझ येणार: गडकरी

आवाज न्यूज नेटवर्क –
नागपूर – नागपूर देशातील सर्वोत्तम शहर असेल. कोटयवधीची कामे, नवे प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि आवश्यक गरजांची पूर्ती देणारी अनेक कामे होत आहेत. याअंतर्गत येत्या चार महिन्यांत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामास सुरुवात होईल, अशी माहिती भुतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. परसिस्टंन्ट सभागृहात आयोजित तिसऱ्या अॅन्युअल ग्लोबल समिटच्या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विकसित करण्यासाठी ८ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. येथे एअर कार्गो आणि पॅसेंजर हब होईल. पतंजलीच्या प्रकल्पाने या विमानतळाला मदत होईल. सामाजिक उद्यमशीलता म्हणून हा प्रकल्प सुरू होत आहेत. योग परत आला. आता विदेशात भारतीय गायींचे जुने दिवस परत येतील, अशी पतंजलीकडून अपेक्षा आहे. अशा प्रकल्पाने नागपुरातून कामास सुरुवात होत आहे. याचा फायदा विदर्भातील गरिबांना होईल.
गडचिरोलीतील औषधे जागतिक पातळीवर जातील. यासाठी ५ हजार कोटीची , गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून लोकांना रोजगार मिळेल. आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार होऊन देशी औषधी मिळतील. गुजरातमधील ‘अमुल’ नागपुरात येऊन येथे प्रकल्प सुरू करीत आहे. पशुखाद्य तयार करण्याची संधी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार आहे.

ऊसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. एकूणच काय तर शहराचा एकात्मिक विकास होत आहे. माहिती तंत्रज्ञान हवे, सोबत बांबू व बायोगॅसचे प्रकल्पही आवश्यक आहे. घर नसलेल्यांसाठी अडीच लाखात फ्लाय अॅशची ५० हजार घरे बनत आहेत.

सुमारे ३० हजार कोटींची पायाभूत विकासकामे होत आहेत. ९ कोटींचा मेट्रो प्रकल्प, ७५ टक्के सौरऊर्जेवर मेट्रो धावणार आहे. २६ हजार कोटींच्या रस्त्यांची कामे होत आहे. १ डिसेंबरपासून ५० वातानुकूलित बस शहराच्या रस्त्यावरून धावणार आहे. इन्फोसीस, टीसीएस, टेक महेंद्र, रिलायन्स, एचसीएल, टीसीएल यासारख्या मोठया कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. बोईंगतर्फे ७०० कोटीचा एमआरओ सुरू आहे. यातून १५०० रोजगारनिर्मिती होत आहे. कोराडीजवळ अशोक लेलॅण्डतर्फे २५एकरवर प्रकल्प टाकला आहे. येथे २५ हजार चालक तयार होत आहे. टेक महेंद्राचे गुरुनानी यांनी नागपुरात येऊन विद्यापीठ स्थापण्याची तयारी केली आहे. याशिवाय, आयआयआयटी, आयआआयएम, कायदा विद्यापीठ व इतर कौशल्य विकास शिक्षण प्रकल्पांसाठी १२५००० कोटीची गुंतवणूक होत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *