facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / आकाशवाणीवर रंगणार कलाकारांच्या मुलाखती

आकाशवाणीवर रंगणार कलाकारांच्या मुलाखती

आवाज न्यूज नेटवर्क –
मुंबई – कलाकार म्हणून कलाकारांविषयी पडलेले प्रश्न आणि त्यांची तितकीच क्रिएटिव्ह उत्तरे ऐकणे ही प्रत्येकासाठीच पर्वणी असते. हीच पर्वणी आकाशवाणीवर अनुभवायला मिळणार आहे. कवी-अभिनेता किशोर कदम हे स्वतः मुलाखतकाराच्या भूमिकेत असतील.

या कार्यक्रमाचे नाव अजून ठरले नसून दोन डिसेंबरपासून त्याचे प्रसारण सुरू होणार आहे. ‘आकाशवाणीवर मी घेत असलेल्या मुलाखती थोड्या वेगळ्या असतील. एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून मला पडलेले प्रश्न मी या कलाकारांना विचारेन. त्याची तितक्याच क्रिएटिव्ह पद्धतीने उत्तरेही आपल्याला मिळतील,’ असे किशोर कदम यांनी सांगितले.

गुलजार यांच्या दोन भागातील मुलाखतीपासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल. दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मुलाखतीही रेकॉर्ड झाल्या असून आणखी काही दिग्गज या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचे समजते. संभाव्य नावांमध्ये नासिरुद्दीन शहा, अनुपम खेर यांचाही समावेश आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *