facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / एटीएमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष पडले महाग

एटीएमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष पडले महाग

आवाज न्यूज नेटवर्क – 
नाशिक – एटीएममधून स्वाइप केल्यानंतरही पैसे न मिळाल्यामुळे ग्राहकाने केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या युनियन बँकेला जिल्हा ग्राहक न्यायमंचाने १०० रुपये रोज याप्रमाणे ३७० दिवसांचा ३७ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या निर्णयात रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाचा आधार घेण्यात आला असून, त्यामुळे बँकेला ग्राहकाच्या तक्रारीकडे केलेल दुर्लक्ष महागात पडले आहे. या दंडाबरोबरच न्यायमंचाने मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जाचा खर्च दोन हजार असे सात हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक येथील काॅलेजरोडवर राहणारे संजय विठ्ठल देवरे यांनी याबाबत जिल्हा ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी माझे युनियन बँकेत खाते असून, मी मालेगाव येथे एटीएममधून १५ हजार रुपये काढण्यासाठी कार्ड स्वाइप केले. पण, एटीएममधूून रक्कम निघाली नाही. मात्र, मला एसएमएस प्राप्त झाला व त्यात माझी रक्कम माझ्या बॅलन्समधून वजा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा स्वाइप केले, पण पैसे निघाले नाहीत. त्यामुळे युनियन बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर त्याची तक्रार केली. त्यानंतर ही रक्कम जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मला तीस हजार रुपये मिळालेले नसतानादेखील खात्यातून ही रक्कम डेबिट झाली. मात्र, तक्रार करूनही पैसे न मिळाल्यामुळे मी लेखी अर्ज करून सीसीटीव्ही व फुटेजची तपासणी करून रक्कम मिळावी, अशी मागणी केली. त्यानंतर बँकेने पंधरा हजार रुपये जमा केले व उर्वरित रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. नंतर मी पुन्हा पत्र देऊन पंधरा हजार रुपये व रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे १०० रुपये नुकसानीची रक्कम मिळावी, असे सांगितले. या तक्रारीनंतर युनियन बँकेतर्फे युक्तिवाद करताना सांगण्यात आले, की फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा केली आहे. पण, नंतर कोणतेही ट्रान्झॅक्शन फेल झालेले नसल्यामुळे नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी नाही.

दुर्लक्षाची किंमत ४४ हजार!

जिल्हा न्यायमंचाने निकाल देताना सांगितले, की रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने वेळोेवेळी डायरेक्शन्स दिलेले आहेत. याची जाणीव असतानादेखील बँकेने विवादित ट्रान्झॅक्शनची दखल न घेता रक्कम देण्यास नकार दिला व ग्राहकास वेठीस धरल्याची बाब अतिशय गंभीर असून, ही सेवेतील कमतरता आहे. २५ जानेवारी २०१५ रोजी तक्रार केल्यानंतर रक्कम ७ एप्रिल २०१६ रोजी जमा केली आहे. त्यामुळे या काळातील ३७० दिवसांचे दररोज १०० रुपयाप्रमाणे ग्राहक ३७,००० रुपये मिळण्यास पात्र आहे. त्यामुळे त्यांना ही रक्कम अदा करावी, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या दंडाबरोबरच न्यायमंचाने मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जाचा खर्च दोन हजार असे सात हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेला तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याची किंमत ४४ हजार रुपये पडली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी व कारभारी जाधव यांनी दिला.

काही ठिकाणी गैरसोय

काही बँकांनी ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग न केल्यामुळे अनेकांना ज्येष्ठ खातेदारांना डिपाॅझिट व पैसे काढण्याच्या रांगेतच उभे राहावे लागले. त्यामुळे ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली. बँकेत आलेल्या ज्येष्ठांना दोन हजारांच्या नोटा देऊन शाई लावली जात असल्यामुळे फक्त दोन हजारांच्या नोटा कशा बदलून देता, असा प्रश्न अनेकांनी विचारला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *