facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / एटीएम शोधा वेबसाइटवर

एटीएम शोधा वेबसाइटवर

आवाज न्यूज नेटवर्क – 
पुणे – उच्च मूल्य असलेल्या नोटाबंदीमुळे उभ्या राहिलेल्या समस्यांनी हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी देश-विदेशातील आयटीयन्सनी पुढाकार घेतला असून, देशभरातील पैसे असलेल्या एटीएमची ठिकाणे दर्शविणारी वेबसाइट त्यांनी तयार केली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकच एका क्लिकद्वारे ही माहिती अपडेट करून असंख्य नागरिकांना मदत करू शकणार आहेत.
बँक व एटीएममधून पैसे मिळवण्यासाठी नागरिकांना बँका व एटीएममध्ये धाव घ्यावी लागत आहे. यावर आठ भारतीय सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सनी वेबसाइटच्या सहाय्याने उपाय काढला आहे. त्याद्वारे जवळच्या बँकेच्या व एटीएमचा पत्ता आणि त्यामध्ये ‘कॅश’ आहे की नाही, याची माहिती मिळेल. बँकेत आणि एटीएममध्ये नोटा मिळत नसल्याने नागरिकांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. यावर तोडगा म्हणून या सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सनी indiafindbank.in ही वेबसाइट विकसित केली आहे.

वेबसाइटवर देशभरातील बँक व एटीएमची माहिती उपलब्ध आहे. वेबसाइच्या पेजवर गेल्यावर तुम्हाला हव्या त्या परिसरातील बँक व एटीएमची माहिती तर मिळणारच आहे. याशिवाय त्या बँक किंवा एटीएममध्ये पैसे आहे की नाही, याची माहिती मिळेल. त्यामुळे ज्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध आहे, त्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढता येईल. या वेबसाइटवर पैसे असणारे एटीएम हिरव्या रंगात
दिसणार आहे.

मात्र, वेबसाइटमधून अधिकाधिक नागरिकांना मदत होण्यासाठी नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी नागरिकांना एखाद्या एटीएममध्ये पैसे असल्याचे समजल्यास त्यांना त्या एटीएमचे स्टेटस बदलावे लागेल. त्यासाठी ‘कॅश अॅव्हॅलेबल’ आणि ‘कॅश नॉट अॅव्हेलेबल’ असे दोन विकल्प दिले आहेत. पैसे असल्यास ‘कॅश अॅव्हॅलेबल’ तर पैसे नसल्यास ‘कॅश नॉट अॅव्हेलेबल’ असे एटीएमचे स्टेटस बदलावे लागेल. सुनील जैन, रोहीत तोष्णिवाल, अविनाश निगम, नितीन कुमार, आशुतोष नंदन, अजिंक्य हरकरे, अरुण शर्मा, संकेत बिंडल या सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सनी वेबसाइटची निर्मिती केली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *