facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / ठोकळे, मण्यांनी शिकवा गणित

ठोकळे, मण्यांनी शिकवा गणित

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – लहानपणी गणितासाठी मनीमाळ, ठोकळा तसेच नाणी आणि नोटा यासारख्या अनेक पद्धतींचा वापर केला जायचा. या पद्धती आता पुन्हा शिक्षणात येणार असून यापुढे ही पद्धत शाळांमध्ये वापरण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर व्हावी म्हणून हा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करण्यासाठी मणीमाळ, ठोकळा, नाणी-नोटा, गणितीय जाळी आदी साहित्यासह गणित विषय शिकविण्याची पद्धत वापरणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. ही पद्धत गणितीय संकल्पना स्पष्ट होण्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे दिसून आल्याने ही पद्धत शाळांमध्ये वापरण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

राज्यस्तरावर पहिली ते पाचवी शिकवणाऱ्या शिक्षकांची नुकतीच एक कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत उपयुक्त गणिती साहित्यांचा वापर करण्यात आला. हे साहित्य आता शाळांमध्ये देखील वापरण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. मात्र हे साहित्य मिळवण्यासाठी शाळांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

पहिली ते पाचवीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मणीमाळ, एकक, दशक दांडे, शतक पाटी व हजाराचा घन ठोकळा, नाणी आणि नोटांची प्रतिके, वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे, मॅचिंग सेटस, गणितीय जाळी, संख्या कार्ड, जिओ बोर्ड, मीटर टेप, मणी, दोरी, पाट्या आदी साहित्यांतून गणिताचे शिक्षण द्यावे. प्रत्येक मुलांना साहित्य प्रत्यक्ष हाताळण्याचा अध्ययन अनुभव आणि प्रत्येक सहा मुलांसाठी एक संच उपलब्ध करण्याच्या सूचनाही या परिपत्रकातून केल्या आहेत. शाळांनी हे साहित्याचे संच ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्याकडून तसेच लोकसहभागातून, सीएसआरच्या माध्यमातून मिळावावेत अशा सूचनाही परिपत्रकात दिल्या आहेत. तरीही हे साहित्य मिळवण्यासाठी शाळांना मोठी कसरत करावी लागणार आहे. गावागावातील ग्रामपंचायतींकडे इतका निधी आहे का असा प्रश्नही निर्माण होणार आहे. त्यामुळे हे साहित्य सर्व शाळांना सर्व शिक्षा अभियानमार्फत सरकारने द्यावे, अशी मागणीही काही शाळांनी केली आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *