facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / पत्नीपीडित आघाडी रस्त्यावर

पत्नीपीडित आघाडी रस्त्यावर

आवाज न्यूज नेटवर्क – 
औरंगाबाद – जागतिक पुरुष हक्क दिनानिमित्त शनिवारी पत्नीपीडित पुरुष आघाडी रस्त्यावर उतरली. ‘जागतिक पुरुष दिनाचा विजय असो, पुरुष आयोग स्थापन करा, एकतर्फी कायदे बंद करा,’ अशा घोषणा देत वाहन फेरीतून शहरवासीयांचे लक्ष वेधले.
क्रांतिचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास या फेरीस सुरुवात झाली. अनेक क्षेत्रात महिला आणि पुरुष समानता आली. मात्र, महिला कायद्याच्या कलम ४९८, महिला हिंसाचार कायदा २००५, विनयभंग (३५४) या कायद्यांचा काही वेळा गैरवापर करून पुरुषांना खोट्या पद्धतीने अडकविले जाते, असा आरोप पुरुष आघाडीने दिलेल्या निवेदनात केला आहे. परिणामी, अशा व्यक्तींना कोणाकडेही दाद मागता येत नाही. त्यांच्या हक्काबद्दलची जाणीव करून देण्यासाठी जागतिक पुरूष हक्क दिनाचे औचित्य साधून ही फेरी काढली, असे अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले. उपाध्यक्ष राहुल वाढवे, सचिव डॉ. प्रकाश कदम, कोषाध्यक्ष संजय नरवडे, विशाल नांदरकर, प्रमोद तरवटे, सुरेश फुलारे, शेख रऊफ, तुषार मादळमोहीकर आदी उपस्थित होते. सिल्लेखाना चौक, सावरकर चौक, निरालाबाजार, औरंगपुरा, मिलकॉर्नर, भडकलगेट मार्गे काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आली. शेख अजहर, प्रभाकर बोंगाने, रवींद्र कीर्तीशाही, जवाहर भगुरे, एकनाथ राठोड, आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पत्नी पीडितांसाठी आश्रम

‘वाळूज परिसरातील गट नंबर १२१, शरणापूर येथे पत्नी पीडित पुरुषांसाठी एक आश्रम उभारण्यात आला आहे. त्याचे उदघाटन पत्नी पीडित पुरुषाच्या हस्ते शनिवारी करण्यात आले,’ अशी माहिती पुरुष आघाडीने दिली.

लायडिटेक्टर बसवा
पत्नीपीडित पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करा, पोलिस हेल्पलाइन सुविधा सुरू करा. पतीविरुध्द येणाऱ्या खोट्या तक्रारी रोखण्यासाठी पोलिस ठाण्यात लायडिटेक्टर बसविण्यात यावे, प्रत्येक पोलिस ठाण्यात पुरुष सुरक्षा समिती स्थापन करा,’ अशा मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना देण्यात आले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *