facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / पाइपलाइनच्या वाढीव रकमेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

पाइपलाइनच्या वाढीव रकमेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

आवाज न्यूज नेटवर्क – 

कोल्हापूर – केंद्र सरकारच्या निकषानुसार थेट पाइपलाइन योजनेत महापालिकेवर वीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने वाढीव दहा टक्के रक्कम राज्य सरकारने भरावी यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार आहे. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत त्या संबंधीचा ठराव झाला. सभेत नगरसेवकांनी घरफाळा विभागावरून प्रशासनाला धारेवर धरले.

केंद्र सरकारने योजनेच्या ४२३ कोटींच्या प्रकल्पातील हिश्शाचा निधी ८० टक्क्यावरून साठ टक्के कमी करत राज्य सरकार आणि महापालिकेवर प्रत्येकी वीस टक्के निधीची जबाबदारी निश्चित केली. या हिशेबाने महापालिकेला ८५ कोटी गुंतवावे लागणार आहेत. महापालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा असल्याने हा वाढीव दहा टक्के निधी राज्य सरकारने भरावा, असा ठराव झाला. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी कसबा बावडा येथे बंधारे बांधण्यासाठी व त्यासाठी आवश्यक रस्त्यासाठी आरक्षित करण्याच्या फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर झाला.

 दरम्यान, नगरसेवक अभिजीत चव्हाण यांनी सहायक अधीक्षकाला मारहाण केल्यानंतर गुरुवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी त्या घटनेच्या निषेधार्थ दिवसभर कामकाज बंद ठेवले. आंदोलनमुळे महापालिकेचे काम बंद राहिल्याने नागरिकांना फटका बसला. हा प्रकार योग्य नाही. प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी सूचना नगरसेवक महेश सावंत, किरण नकाते यांनी केली.

व्यवसाय परवाना नसताना भक्त निवास

शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात भक्त निवास आहेत. जवळपास ११३ भक्त निवासकडे व्यवसाय परवाना नाही. त्यांच्याकडून रहिवासी क्षेत्रानुसार घरफाळा आकारणी सुरू असून महापालिकेचे नुकसान होत असल्याचे नगरसेवक विजय खाडे यांनी निदर्शनास आणले. नगरसेविका उमा बनछोडे यांनी व्यवसाय परवानाअभावी अनेक ठिकाणी दुकाने सुरू आहेत. शिवाजी मार्केटमधील दुकानमालकांनी दुकानगाळे अन्य व्यवसायासाठी भाड्याने दिली आहेत. त्याची चौकशीची मागणी केली. रुपाराणी निकम यांनी झोपडपट्टी परिसरात अनधिकृत झोपड्यांची संख्या वाढत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *