facebook
Thursday , February 23 2017
Breaking News
Home / Featured / हयातीचा दाखला; योजनेला मुदतवाढ

हयातीचा दाखला; योजनेला मुदतवाढ

आवाज न्यूज नेटवर्क – 
नागपूर – केंद्र सरकारच्या धर्तीवर आता सर्व राज्य सरकारी निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत येत्या १५ जानेवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.

महाराष्ट्र कोषागार नियमाप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत हयातीचा दाखला देणे बंधनकारक असते. हा हयातीचा दाखला निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात, त्या बँकांमार्फत संबंधित कोषागारास सादर केला जातो. यावर्षी ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती.

 केंद्राने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा वापरास बंदी केल्याने व त्या नोटा बँकांमध्ये बदलून देण्याची किंवा भरण्याची व्यवस्था केल्याने बँकांमध्ये गर्दी वाढली आहे. बँक कामकाजावर ताण निर्माण झाला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातदेखील हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली.

हा निर्णय अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे, जिल्हा परिषदेचे निवृत्तीवेतनधारकांनाही लागू राहतील, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *