facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / खासगी बसच्या धडकेत दोन इंजिनीअरचा मृत्यू
bus-accident

खासगी बसच्या धडकेत दोन इंजिनीअरचा मृत्यू

आवाज न्यूज नेटवर्क – 
पुणे – हडपसर येथील वैभव टॉकीजसमोर खासगी बसची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दोन आयटी इंजिनीअरचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहनीश तुकाराम गाकरे (वय २४ रा. ग्रँड बे सोसायटी, शेवाळवाडी), ऋषिकेश वसंत परदेशी (वय २४ रा. हनुमान मंदिराजवळ, सासवड रोड) अशी मृत्यू झालेल्या दोन इंजिनीअरची नावे आहेत. याबाबत सचिन मंजीभाई मकवाना यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकवाना व मयत ऋषिकेश व सचिन हे तिघेजण मगरपट्टा येथील एका कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता काम संपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर रोडला वैभव टॉकीजसमोर आले असता कर्णे हॉस्पिटलसमोर एक प्रवासी वाहतूक करणारी बस थांबली होती. त्या बसच्या चालकाने अचानक बस सुरू करून मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने वळवली. त्या वेळी मकवाना यांनी स्वतःला वाचवून ते बसच्या पुढे निघालो. त्यांच्या मागून दुचाकीवरून मोहनीश व ऋषिकेश येत होते. त्यांना अपघात झाल्याचा मोठा आवाज आला. त्यांनी पाठीमागे जाऊन पहिले असता मोहनीश व ऋषिकेशच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागला होता.

दुचाकी उजव्या बाजूला पडली होती. खासगी बसने धडक दिल्यानेच मोहनीश व ऋषिकेश गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर ती बस निघून गेली. मकवाना यांनी दोघांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोहनीश हा मूळचा नागपूरचा आहे. तो घरात मोठा होता. त्याच्या पाठीमागे आई वडील व एक लहान भाऊ आहे. नोकरीच्या निमित्ताने दोघेही पुण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *