facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / ग्राहकाकडून व्यापाऱ्याला मारहाण
crime-news

ग्राहकाकडून व्यापाऱ्याला मारहाण

आवाज न्यूज नेटवर्क – 
जळगाव – शेती उत्पादनाचे पैसे बाकी असल्याने ते मागितल्याचा राग येऊन तीन ते चार जणांनी बी. जे. मार्केट येथे एका व्यापाऱ्याला लोखंडी सळई व लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी आज जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रभात कॉलनीतील रहिवासी सुनील चुनिलाल पाटील यांचे कृषक भवनजवळ सेंद्रीय शेती अन्नधान्य विक्रीचे दुकान आहे. पाटील यांनी त्यांच्या ओळखीचे आनंद मोहनलाल गांधी याला ८ हजार ६४० रुपयांचे शेती उत्पादन उधारीने दिले. २९ सप्टेंबर रोजी, सुनील पाटील हे बी. जे. मार्केट जवळून जात असताना आनंद हा त्याचे वडील व भाऊसोबत बसलेला दिसला. त्यावेळी त्यांनी उधारीचे पैसे मागितल्यानंतर आनंद यास पैसे मागितल्याचा राग आला. आनंद याने लोखंडी सळईने पाटील यांच्यावर वार केला. आनंदचे वडील मोहनलाल, भाऊ राजू व रवि नावाच्या व्यक्तीने लाकडी दांड्याने मारहाण केली होती.

Check Also

आदिवासी तडवी समाजाचा मोर्चा

तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी मुबारक तडवी हा जळगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात शिकत होता. तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *