facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / जुन्या नोटामुळं उपचार नाकारले; बाळाचा मृत्यू
ruby-hall

जुन्या नोटामुळं उपचार नाकारले; बाळाचा मृत्यू

आवाज न्यूज नेटवर्क – 

पुणे – केंद्र व राज्य सरकारनं आदेश देऊनही जुन्या नोटा नाकारण्याचा रुग्णालयांचा आडमुठेपणा लोकांच्या जिवावर बेतू लागला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही असाच प्रकार घडला आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयानं जुन्या नोटा असल्याचं कारण देत उपचार नाकारल्यामुळं एका बाळाचा मृत्यू झाला आहे. बाळाच्या आई-वडिलांनीच तसा आरोप केला आहे.

पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दाम्पत्याला दोन दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात मुलगी झाली. मात्र, बाळाला हृदयाचा त्रास असल्याने, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी खुंटे कुटुंबीय बाळाला घेऊन शनिवारी सकाळी दहा वाजता पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना साडेतीन लाख रुपये जमा करण्यास सांगितले.

खुंटे यांनी काही रक्कम रोखीनं व काही रक्कम करंट अकाउंटच्या स्वरूपात भरण्याची तयारी दाखवली. मात्र, रुग्णालय प्रशासनानं सर्व रक्कम रोख स्वरूपात देण्याचा आग्रह धरला. त्याशिवाय, उपचार होऊ शकणार नसल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रक्रियेत बराच वेळ गेल्यानं बाळाचा त्रास वाढला. संध्याकाळपर्यंत बाळाचे अनेक अवयव काम करेनासे झाले. त्यामुळं आता शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नंतर बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण ते वाचू शकलं नाही. रोख रकमेसाठी रुग्णालय प्रशासनानं केलेल्या अडवणुकीमुळंच आमच्या बाळाचा जीव गेल्याचा आरोप खुंटे दाम्पत्यानं केला आहे.

रुग्णालयानं फेटाळला आरोप

रुग्णालय प्रशासनानं मात्र खुंटे दाम्पत्याचा आरोप फेटाळला आहे. ‘आम्ही लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करतो. त्यामुळं असा प्रकार घडणं शक्य नाही. तरीही या प्रकाराची माहिती घेऊ, असं रुबी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट यांनी सांगितलं.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *