facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / तराफ्यावरून जीवघेणा प्रवास
bridge-news

तराफ्यावरून जीवघेणा प्रवास

आवाज न्यूज नेटवर्क – 
अहमदनगर – तीस वर्षांपासून पिंपळगाव आवळा परीसरातील बोराटेवस्ती येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना कानेरी नदीवर पूल नसल्याने तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वारंवार मागणी करुनही या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच शासन येथे पूल बांधणार आहे का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

पिंपळगाव आवळा हे जामखेड पासुन पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. तीन हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. गावची ग्रामपंचायत ही सात सदस्यांची आहे. गावाच्या अगदी जवळूनच कानेरी नदी वाहाते. मात्र, या नदीच्या पलीकडे बोराटेवस्ती, मोहितेवस्ती, भागडेवस्ती, नरकेवस्ती अशा विविध ठिकाणी सातशे ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. तर तीन ग्रामपंचायत सदस्य देखील या परीसरात रहातात. गाव आणि या परीसरात असलेल्या वस्त्यांच्या मधुन जाणाऱ्या कावेरी नदीवर १९८२ पासून पूल नाही. जाण्या येण्यासाठी गावकऱ्यांनी बनवलेल्या थर्मकॉलचा तराफा बनविला आहे. प्रवासासाठी याचाच आधार गावकऱ्यांना घ्यावा लागतो. येथील नदीच्या पाण्याची खोली पन्नास फुटांपर्यंत आहे.

तराफ्यावर बसुन दोरीच्या साहाय्याने तो ओढत येथील प्रवास करावा लागतो. शालेय विद्यार्थि, महिला व ग्रामस्थांसाठी ही रोजची जीवघेणी कसरत ठरत आहे. मोटारसायकल देखील या नदीतून तराफ्यावर टाकुन गावात अणावी लागते. तसेच रात्री अपरात्री एखादी व्यक्ती अजारी पडली तर त्याच्यावर उपचारासाठी कोणताही डॉक्टर गावात येण्यास तयार होत नाही.

या ठिकाणी साठ फूट लांबीच्या पूलाची आवश्यकता असल्याने येथील गावकऱ्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे पूल बांधण्याची मागणी केली आहे. याबाबत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना येथील पूलासाठी पूर परीस्थिती व या भागाची पहाणी करण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. असा आरोप ग्रामस्थांनी केली आहे. तरी लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

शाळेतून घरी व घरुन शाळेत जाताना आम्हाला थर्मकॉलने बनवलेल्या तराफ्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रवास करताना पाणी पाहून खूप भिती वाटते. कधीकधी शाळेत जाण्यासाठी उशिर होतो. त्यावेळी तराफ्याची दोरी स्वता: हाताने ओढावी लागते. त्यामुळे खूप त्रास होतो. पूढे तालुक्याच्या शाळेत जाईपर्यंत तरी नवा पुल बांधावा.

– प्रणाली बाळासाहेब मोहिते, विद्यार्थीनी

घरापासून गावातील अंतर हे अर्धा किलोमीटरचे आहे. याच रस्त्यावर कावेरी नदी आहे. मात्र, गावात काही किराणा सामान, दळण, अथवा भाजी बाजार अणायलचा असेल तर पूल नसल्याने जाण्यासाठी तराफा बनवला आहे, याचा अधार घेऊन जावे लागते. महिलांना तर या वर बसुन जाताना काळजी घ्यावी लागते. आम्हा महिलांना दिवसभर या तराफ्यावरुन ये जा करावी लागते.
– साळुबाई दत्तात्रय बोराटे, महिला ग्रामस्थ

मागील पंचवार्षिक ग्रामपंचायत वेळी मी सरपंच होतो, त्यावेळी नदीची लांबी खूप मोठी असल्याने रोजगार हमी योजनेंतर्गत तीनशे फुट कच्चा रस्ता बनवला आहे. मात्र, पुढे साठ फूट पूल बांधण्याची गरज आहे. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागास पत्रव्यवहार करून देखील अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. गेल्या तीस वर्षांपासून येथे नवीन पूल व्हावा, यासाठी मागणी करून देखील शासनाकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी लवकरात लवकर पूल व्हावा व न्याय मिळावा.

– साहेबराव बोराटे, ग्रामपंचायत सदस्य ७ पिंपळगाव आवळा

Check Also

news-14

सुशीकुमार शिन्देकडून शहीद कुणाल गोसावी परिवाराचे सांत्वन

आवाज न्यूज नेटवर्क –  पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *