facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / दुसरी कसोटीत २४६ धावांनी भारत विजय
India England Cricket

दुसरी कसोटीत २४६ धावांनी भारत विजय

आवाज न्यूज लाईन
विशाखापट्टणम-
इंग्लंडविरोधातील दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला आहे. भारताने फक्त 158 धावांवर इंग्लंड संघाला ऑल आऊट केलं.  भारताने तब्बल 246 धावांनी विजय मिळवला आहे. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताला विजयासाठी 8 विकेट्सची गरज होती. सामना ड्रॉ करण्याच्या उद्देशाने इंग्लंड संघ मैदानावर उतरला होता. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचे खेळाडू जास्त वेळ टिकू शकले नाही, आणि एकामागोमाग विकेट्स गमावल्या. पहिल्या सत्रात भारताने 55 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
भारतीय फिरकीपटूंविरुद्ध इंग्लंडने अतिसावध पवित्रा स्वीकारला खरा, पण दुसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताने हमीद व कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक यांना माघारी परतवत आपली पकड मजबूत केली.
विजयासाठी ४०५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने कर्णधार कुक व युवा हसीब हमीदच्या सावध फलंदाजीच्या जोरावर चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद ८७ धावांची मजल मारली. कुक व हमीद यांच्या फलंदाजीमुळे गेल्या वर्षी फिरोजशाह कोटलामध्ये हाशिम आमला व एबी डिव्हिलियर्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या स्मृती ताज्या झाल्या.
रविवारी पहिली दोन सत्रे इंग्लंडसाठी समाधानकारक ठरली. कुक (१८८ चेंडूंना सामोरे जाताना ५४) आणि १९ वर्षीय हमीदने ( १४४ चेंडूंना सामोरे जाताना २५) सलामीला ७५ धावांची भागीदारी केली. इंग्लंडला दुसऱ्या डावात १५० षटके खेळायची आहेत. त्यापैकी ५१ षटके या दोन सलामीवीरांनी खेळून काढली, हे विशेष. कुकने ५३ वे अर्धशतक झळकावले. कसोटी कारकिर्दीतील ही त्याची सर्वात संथ अर्धशतकी खेळी ठरली. रवींद्र जडेजाने दिवसाच्या अखेरच्या षटकात कुकला बाद करीत भारताला आनंद साजरा करण्याची संधी दिली. इंग्लंडला अखेरच्या दिवशी विजयासाठी ३१८ धावांची तर भारताला 8 विकेट्सची गरज होती.
भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळी करत भारताला विजय मिळवून दिला आहे. सोबतच 1-0 ने भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *