facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / फक्त टीव्हीवर झळकण्यासाठी खासदारांचा गोंधळ -लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन

फक्त टीव्हीवर झळकण्यासाठी खासदारांचा गोंधळ -लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन

आवाज न्यूज लाईन

नवी दिल्ली : एकीकडे देशभरात बँक ग्राहकांच्या संयमी रांगा असताना संसदेत मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा दंगा सुरु आहे. फक्त टीव्हीमध्ये झळकण्यासाठी काही जण गोंधळ घालत असतात, असा आरोप खुद्द लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केल्यानं लोकसभेत रणकंदन माजलं.

विरोधकांनी चलनबंदीवर चर्चेची मागणी करत लोकसभेमध्ये गोंधळ घातला. पण लोकसभाध्यक्षांनी विरोधकांची कोणतीही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी वेलमध्ये प्रवेश केला आणि कामकाजात अडथळा निर्माण झाला. त्याचवेळी सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना फक्त टीव्हीमध्ये झळकायचं असतं असा शेरा मारला.

त्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही संताप अनावर झाला. टीव्हीवर झळकण्यासाठी नाही, तर नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही इथं आल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. पण विरोधकांच्या या गोंधळातही लोकसभाध्यक्षांनी कामकाज सुरुच ठेवलं आहे.

गेल्या आठवड्यात नोटाबंदीच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा झाली. पण लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब होत राहिली. त्यामुळे देशभरात वातावरण निवळत असताना संसदेत मात्र रणकंदन माजण्याची शक्यता आहे.

काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि जमा करण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी होऊ लागली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *