facebook
Thursday , December 8 2016
Home / Crime / भाजप आमदारपुत्रांचा बारमालकाशी वाद, तरुणाने जीव गमावला
nagpur-murder-shubham-531x395

भाजप आमदारपुत्रांचा बारमालकाशी वाद, तरुणाने जीव गमावला

नागपूर : नागपुरातील तरुणाच्या हत्येप्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. बारमधल्या भांडणात मध्ये पडल्यामुळे शुभम महाकाळकर या तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

रविवारी रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजीत खोपडे आणि क्लाऊड सेव्हनच्या बारमधल्या कर्मचाऱ्यांची भांडणं झाली. त्या भांडणात अभिजीत खोपडेनं बारची तोडफोड केल्याचा आरोप आहे.

त्याचवेळी अभिजीतनं आपला धाकटा भाऊ रोहित खोपडेला आपल्या मदतीसाठी बोलावलं. रोहितसोबत असलेला शुभमही बारमध्ये पोहोचला आणि पुन्हा एकदा भांडणाला तोंड फुटलं. बारमधल्या कर्मचाऱ्यांनी शुभम आणि अभिजीतच्या गाडीची तोडफोड केली.

बारमधून बाहेर पडल्यानंतर बार कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन अर्धा किलोमीटर अंतरावर लक्ष्मीभुवन परसरात गाठलं. तिथेच त्याची भोसकून हत्या केल्याचा आरोप शुभमच्या परिवाराने केला आहे.

या भांडणाशी कोणताही संबंध नसलेल्या शुभमला या प्रकरणात जीव गमवावा लागल्यानं नातेवाईकांमध्ये संतापाची भावना आहे. या प्रकरणी बार मालक सनी बामब्रतवार याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारमध्ये धुडगूस घातल्या प्रकरणी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झाला असून त्यात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन्ही मुलांचं नाव आहे. अभिजीत खोपडे, रोहित खोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल आहे. तोडफोड करणे आणि बार मालकाला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे.

बारमधील तोडफोडी आणि मारामारीनंतर अर्धा किमी अंतरावर झालेल्या शुभम महाकाळकरच्या हत्या प्रकरणात बार मालक सनी बामब्रतवार आणि इतर 7 ते 8 जणांविरोधात हत्येचा (कलम 302) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम महाकाळकर हा राष्ट्रीय पातळीवर लेझिमचा खेळाडू होता. 26 जानेवरीला दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलनात गेले तीन वर्ष तो सहभागी होत होता.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *