facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / ‘रोबो 2’चं पहिलं पोस्टर रिलीज
robo-2

‘रोबो 2’चं पहिलं पोस्टर रिलीज

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या ‘रोबो 2’ म्हणजेच ‘2.0’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारचा कधीही न पाहिलेला लूक दिसत आहे.

सिनेमाचे निर्माते, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. 350 कोटी एवढ्या हायबजेट सिनेमाचा फर्स्ट लूक सिनेनिर्माता करण जोहरच्या हस्ते मुंबईत यशराज स्टुडिओमध्ये रिलीज करण्यात आला.

2017 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारने दिवाळी 2017, असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. ट्विटरवर एक तासापासून ‘2.0’ टॉप ट्रेंडमध्ये आहे. यापूर्वी या सिनेमाचा टीझर पोस्टर  रिलीज करण्यात आला होता.

रजनीकांतचा 2010 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ‘रोबो’चा हा सिक्वेल आहे. ‘रोबो’मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि रजनीकांत यांची मुख्य भूमिका होती. ‘2.0’  मध्ये अक्षय कुमार, एमी जॅक्सन आणि रजनीकांत तिघे मुख्य भूमिकेत असणार आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *