facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / जिल्ह्यातील बँकांमध्ये ३४८ कोटीची रोकड

जिल्ह्यातील बँकांमध्ये ३४८ कोटीची रोकड

चलन तुटवड्याच्या परिणाम बाजारावर सुरूच असून शंभरच्या नोटांचा तुटवडा कायम आहे. सध्या जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडे ३४८ कोटी रुपये उपलब्ध असून जिल्ह्यात ५३५ एटीएमपैकी ३५६ एटीएम सुरू झाली आहेत. मात्र शंभरच्या नोटांची प्रचंड मागणी असल्याने जास्तीत जास्त चार तासातच एटीएम बंद पडत आहेत. जिथे शंभरच्या नोटा उपलब्ध आहेत तिथे मोठ्या रांगा लागल्याचे चित्र सोमवारीही कायम होते. काही एटीएमवर केवळ दोन हजारच्याच नोटा मिळत असल्याने नागरिकांना सुट्या पैशांसाठी मोठी धावाधाव करावी लागली.

बारा दिवसात जिल्ह्यातून १८६६ कोटी रुपये विविध खात्यांमध्ये जमा झाले आहेत. तर ७३९ कोटी रुपये खात्यातून काढले आहेत. ५७ कोटींच्या नोटा बदलून दिल्या असून सध्या नोटा बदलण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. बँकांत रक्कम उपलब्ध असली तरी पैसे दिले जात असताना दोन हजारच्या नोटांबरोबर काही इतर छोट्या देण्यास सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे साडेचार हजारात किमान पाचशे रुपये शंभर रुपयांच्या नोटाद्वारे मिळत आहेत. एटीएममधून शंभरच्या नोटा मिळत नसल्याने बहुतांश एटीएम काही तासातच बंद पडत आहेत. यामुळे सोमवारी एटीएमसमोर दिवसभर रांगा होत्या. ज्यांना दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या, ते सुटे करुन घेण्यासाठी धावाधाव करत होते.

गेल्या काही दिवसात एटीएमचे कॅलिब्रेशन झाले आहे. दोन हजारच्या नोटांबरोबर नवीन येणाऱ्या पाचशे रुपयांच्या नोटा ठेवण्यासाठीची व्यवस्था केली आहे. आठवड्यात पाचशे रुपयांची नोट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुट्या पैशांची चणचण संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बँकांमधील व्यवहार ३० टक्यांनी कमी झाले आहेत. प्लास्टिक मनीचा वापर वाढला असून अनेक दुकानदारांनाही पॉईंट ऑफ सेल्स मशिनची आवश्यकता भासत आहे. गेल्या काही दिवसात बँक ऑफ इंडियाकडून पंधरा मशिन देण्यात आली आहेत. बँक ही मशिन मोफत उपलब्ध करुन देत असून त्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

…………….

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये रक्कम उपलब्ध असून नागरिकांनी धावाधाव करण्याची आवश्यकता नाही. एटीएमही कार्यरत होत आहेत. या आठवडाभरात परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. बँकांमधून पैसे देत असताना काही प्रमाणात सुटे पैसे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

शशिकांत किणींगे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *