facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / तरुणाचा मृतदेह सलीम अली सरोवरात

तरुणाचा मृतदेह सलीम अली सरोवरात

गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सोमवारी सलीम अली सरोवरात आढळला. ज्ञानेश्वर कवडे (रा. सुदर्शनगर, हडको) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी सिटी पोलिस तपास करत आहेत.
सलीम अली सरोवरात एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना सकाळी साडेअकराच्या सुमारास मिळाली. सिटी चौक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृताच्या खिशात आधारकार्ड सापडले. त्यावरून मृताचे नाव ज्ञानेश्वर भाऊसाहेब कवडे (रा. सुदर्शन नगर) असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्ञानेश्वर हा जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजात शिक्षण घेत होता. द्वितिय वर्षांत काही विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने तो चिंतेत होता. या निराशातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली. हेडकॉस्टेबल दिलीप भताने अधिक तपास करत आहेत.

‘बाहेर जाऊन येतो…’

ज्ञानश्वर १९ नोव्हेंबर रोजी सकाळीच घराबाहेर पडला. ‘आई फराळाचे करून ठेव. मी कामानिमित्त बाहेर जाऊन येतो,’ असे त्याने आईला सांगितले होते. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली; तसेच सिडको पोलिस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार देखील दिली होती. त्याचे वडील न्यायवैद्यक कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी अाहे. त्याचा एक भाऊ व बहीण शिक्षण घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *