facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / महापौर परिषदेत बेळगावचा आवाज

महापौर परिषदेत बेळगावचा आवाज

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा कर्नाटक सरकारने आखलेला डाव, महापौर निवडीसाठी खासदार, आमदारांना दिलेला मतदानाचा अधिकार आणि महापौर दालनाच्या फलकाला काळे फासून करण्यात आलेली तोडफोड या अन्यायाचा पाढा बेळगावच्या महापौर सरीता पाटील यांनी सोमवारी मुंबई महापालिकेत येऊन वाचला. बेळगाववासीयांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात अखिल भारतीय महापौर कौन्सिल व महाराष्ट्र महापौर परिषदेत आवाज उठवून सीमा भागातील मराठी माणसाची भक्कम बाजू मांडू, असे आश्वासन यावेळी महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले आहे.

बेळगाव आणि इतर सीमाभाग कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाविरोधात ६० वर्षे १ नोव्हेंबर हा बेळगावचे नागरिक काळा दिवस म्हणून पाळतात. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये बेळगावच्या महापौर पाटील यांच्यासह पालिकेतील अन्य सदस्य सहभागी झाल्याने त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावातील ५०हून अधिक तरुणांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले. या अन्यायाविषयी मुंबईच्या महापौरांनी महापौर परिषदेत तसेच ऑल इंडिया मेअर कौन्सिलमध्ये आवाज उठवावा, अशी मागणी बेळगाव महापालिकेतील सदस्यांनी आंबेकर यांची भेट घेऊन केली.

बेळगावच्या महापौरांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे ही बाब घटनाबाह्य असल्याचे सांगितले. या अन्यायाचा निषेध मुंबई पालिकेने सभा तहकुबी करून नोंदवला आहे. बेळगावच्या महापौरांच्या पाठिशी मुंबईनेच नव्हे तर सर्व राज्यांनी व महापालिकांनी उभे राहायला हवे. यासाठी आपण महापौर परिषदेत आवाज उठवू असे आंबेकर यावेळी म्हणाल्या. बेळगावचे उपमहापौर संजय शिंदे, गटनेते पंढरीनाथ परब, रतन मासेकर, बांधकाम समिती माजी अध्यक्ष विजय भोसले याप्रसंगी उपस्थित होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *