facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / मेरीच्या शाळेतून तोट्या लंपास

मेरीच्या शाळेतून तोट्या लंपास

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – मेरी येथील सीडीओ मेरी शाळेच्या स्वच्छतागृहात बसविलेल्या सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या ४५ नळांच्या तोट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या शाळेत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडली असून, शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, शाळेत पुरेशा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असतानाही पुन्हा अशी चोरी झाल्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिंडोरी रोडवरील मेरी परिसरात सीडीओ मेरी शाळा आहे. पूर्वी गजबजलेली ही मेरी कॉलनी आता पूर्ण ओसाड असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे भुरट्या चोरांचे या परिसरात चांगलेच फावते आहे. काही महिन्यांपूर्वीही शाळेतील स्वच्छतागृहांचे नळ चोरीला गेल्याची घटना घडली होती. एक तोटी साधारणपणे शंभर ते दीडशे रुपयांना मिळते. मुख्याध्यापिका पूजा गायकवाड यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाल्याचे नमूद केले आहे. याबरोबरच शाळेच्या काचा फोडणे, शाळेच्या आवारात कचरा करणे यांसारख्या समस्यांनाही शाळा प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. पोलिस स्टेशनमध्ये पूर्वीही तक्रार दिली असली तरी पुरेसे लक्ष दिले जात नसल्यानेच अशा समस्या वारंवार घडत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच ग्लॅक्सो कंपनी व हॅबिटेट फॉर ह्युमॅनिटीतर्फे या शाळेत स्वच्छतागृहांचा सुधारित सेटअप उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना याद्वारे चांगल्या सुविधा पुरविण्याकडे एकीकडे शाळा लक्ष देत असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या समस्यांचा सामनाही विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

यापूर्वी चोरी झाली तेव्हाही आम्ही तक्रार दिली होती. आता पुन्हा तशीच घटना घडली आहे. पोलिसांकडून या प्रकारणाची ज्या प्रकारे दक्षता घ्यायला हवी त्याप्रमाणे घेतली जात नसल्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या परिसराकडे पोलिसांनी लक्ष द्यावे.

– प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाशिक एज्युकेशन सोसायटी

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *