facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / मोकाट कुत्रे ‘मोबाइल अॅप’वर

मोकाट कुत्रे ‘मोबाइल अॅप’वर

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – शहरातील मोकाट कुत्र्यांची येणाऱ्या काही दिवसांत पळापळ होणार आहे. प्रभागनिहाय त्यांचे पत्ते हुडकून काढण्यात येणार आहेत. श्रेणीनिहाय त्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासाठी मेथडलाइज्ड व शास्त्रीय पद्धतीने गणना करण्यात येत आहे. यासाठी विशेष ‘मोबाइल अॅप’चा वापर होणार असून, जीपीएस प्रणालीने त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येत आहे. सकाळी ७ वाजेपूर्वी रोज ही गणना होईल. त्यांचे फोटो काढून, पुनर्नोंदणी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबरपर्यत यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर अनुभवी संस्थेकडे जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. सध्या मनपाकडे शहरात अंदाजे ९० हजार मोकाट कुत्रे असल्याची नोंद आहे.

प्रत्येक भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अशा मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याची गरज आहे. दहा वर्षांपूर्वी नसबंदी करण्यात आली. मात्र, ही प्रक्रिया फसल्याचे नंतर पुढे आले. त्यामुळे प्रथम शास्त्रीय पद्धतीने गणना करून, त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रभागनिहाय व परिसरनिहाय गणना करण्यात येणार आहे. मोकाट कुत्रा दिवसभर फिरत असला तरी रात्री उशिरा तो त्याच्या जुन्या परिसरात परततो. त्यामुळे सकाळी ७ वाजेपर्यंत तो जागा बदलत नाही. त्यानंतर मात्र तो प्रवासाला निघतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यास आहे. त्यामुळेच सकाळपूर्वी ही गणना करण्यात येणार आहे. कुत्रा, कुत्री, लहान पिलू अशा वेगवेगळ्या स्तरात व जातीनिहाय ही गणना असेल. यात नसबंदी झाली अथवा नाही, याचीही नोंद होणार आहे. एवढेच काय तर, त्यांचे छायाचित्रही मोबाइल अॅपने घेऊन त्याची माहिती असेल. त्यामुळे दुसऱ्या भागात पुन्हा त्याच कुत्र्याची नोंद टाळता येईल. शिवाय, पाळीव कुत्र्यांनाही कॉलर आयडी लावून सर्वेक्षण करण्याची तयारी आहे. सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत आणि भारतीय प्राणी कल्याण बोर्ड, चेन्नई अंतर्गत नोंदणी असलेल्या तसेच प्राणी कल्याण कार्यक्रमाचा (प्राणी जन्मदर नियंत्रण/नसबंदी मोहीम) अनुभव असणाऱ्या संस्थेला हे काम देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांच्या गणनेचा अनुभव
असणाऱ्या संस्थेला प्रथम प्राधान्य देण्याचेही निविदेत मनपाने स्पष्ट केले आहे.

गणनेत ही नोंद होणार

रस्त्याने फिरणारे एकूण मोकाट कुत्रे
सर्व ७२ प्रभागांतील मोकाट कुत्र्यांची संख्या
नसबंदी झालेल्या कुत्र्यांची-कुत्रींची संख्या
कुत्रींसोबत फिरणाऱ्या लहान कुत्र्यांची संख्या
नसबंदी न झालेल्या कुत्र्यांची-कुत्रींची संख्या
प्रत्येक प्रभागातील कुत्र्यांच्या संख्येची घनता
एकूण कुत्रे/कुत्री/छोटा पिलू यांना झालेले गंभीर आजार
जातीनिहाय कुत्र्यांची एकूण संख्या
चार वर्षाखाली पिल्यांची संख्या
कुत्रे व मानवांची प्रभागनिहाय तुलनात्मक प्रमाण

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *