facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / विधान परिषदेचा आज निकाल

विधान परिषदेचा आज निकाल

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निकाल आज, मंगळवारी जाहीर होणार आहे. विजयासाठी ३३० मतांचा जादुई आकडा नेमका कोणता पक्ष गाठतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिवाजीनगर गोडाउन येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. ६९८ मतदारांपैकी ६५८ मतदारांनी मतदान केले असून, विजयी होण्यासाठी उमेदवाराला ३३० मते मिळणे आवश्यक आहे. मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अनिल भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे आणि यशराज पारखी हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. लांडे यांनी भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला असून, त्यांची उमेदवारी ही तांत्रिक ठरली आहे. त्यामुळे भोसले, जगताप आणि येनपुरे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे पक्षाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.
ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी न झाल्यामुळे काँग्रेसने उमेदवार उभा केला. भाजप आणि शिवसेनेपैकी शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मतदार संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ २९८ तर काँग्रेसचे १२४ मतदार आहेत. भाजपची ७१ आणि शिवसेनेची ७६ मते आहेत.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *