facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / सहकारी बँकांच्या स्ट्राँगरुम फुल्ल

सहकारी बँकांच्या स्ट्राँगरुम फुल्ल

कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांत ठेव स्वरुपात जमा झालेली रक्कम स्वीकारण्याबाबत करन्सी चेस्ट बँकांना स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. तसेच पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी घातल्यापासून जमा झालेली ठेव रक्कम कुठे ठेवायची, असा प्रश्न सहकारी बँकांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील ४७ सहकारी बँकांत सुमारे ७५० कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ठेवींचा ओघ वाढत असल्याने सर्वच बँकांच्या स्ट्राँगरुम फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात जमा होणारी रकमेचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नोटा बदलण्यासाठी सर्वत्र रांगा लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे सहकारी बँकांमध्येही चलन बदलण्यासाठी खातेदार गर्दी करत होते. जिल्हा बँकांना ठेवी स्वीकारण्यास अर्थमंत्रालयाने परवानगी दिलेली नाही. इतर सहकारी बँकांत मात्र खातेदार अजूनही ठेवी जमा करत आहेत. जिल्हा बँकांव्यतीरिक्त इतर बँकांमध्ये ठेवी स्वीकारल्या जात असल्या तरी, चलन बदलण्यासाठी आरबीआयकडून नवीन नोटांचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडत आहे.

नोटाबंदीच्या निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील ४७ बँकांमध्ये १९ नोव्हेंबरपर्यंत सुमारे ७५० कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. जमा झालेली रक्कम करन्सी चेस्ट बँकेमध्ये जमा केली जाते. ठेव स्वरुपात जमा झालेल्या रकमेवर सहकारी बँकांना व्याज परतावाही मिळतो. या व्याजातूनच सहकारी बँका ठेवीदारांना व्याज देतात. मात्र जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने सर्वच सहकारी बँकांच्या स्ट्राँगरुम फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे येणारी ठेव स्वरुपातील रक्कम ठेवायची कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘करन्सी चेस्ट बँकांना आरबीआयकडून लेखी आदेश नसताना रक्कम स्वीकारत नसल्याने सहकारी बँकांची अडचण निर्माण झाली आहे. ठेवीची रक्कम स्वीकारली जात नसल्याने जमा झालेल्या ठेवीचे व्याज कसे भागवायचे अशा दुहेरी कात्रीत सहकारी बँका सापडल्या असल्याचे नागरी बँक असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सहकारी बँकांना चलन पुरवठा किंवा ठेवीची रक्कम स्वीकारण्यासाठी करन्सी चेस्ट म्हणून बँकांची नेमणूक केलेली असते. करन्सी चेस्ट बँका चलन स्वीकारत नसल्याने सहकारी बँका प्रचंड अडचणीत आल्या आहेत. आरबीआयने भूमिका बदलण्याची गरज आहे.

विश्वास उटगी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *